Tuesday, June 3, 2025

अहिल्यानगरच्या नेप्तीची हातभट्टी उध्वस्त…! एलसीबीची कारवाई 

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर

अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातल्या अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नमूद आदेशान्वये पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातले पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, विश्वास बेरड, अरूण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे आणि चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देत पथक रवाना केलं.

काल (दिनांक 29/05/2025) रोजी या पथकाने नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी हातभट्टी अड्डयांची माहिती घेऊन छापे टाकत कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 07 गुन्हे दाखल करुन त्यामध्ये 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

सदर कारवाई श सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी