Thursday, June 12, 2025

नेवाशातल्या उस्थळ दुमाला शिवारात अपघात ; दोन ठार ; अकरा जखमी…! 

लोकपत डिजिटल मीडिया अहिल्यानगर

नेवासे तालुक्यातल्या उस्थळ दुमाला शिवारात क्रुझर आणि ट्रकमध्ये झालेल्या  अपघतात क्रुझर गाडीतले २ ठार तर इतर ११ जण जखमी झाले. अपघातातल्या प्रथमेश तेली यांचा जागेवरच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या वृषभ सोनवणे यांचा उपचारादरम्यान नगरच्या रुग्णालयात मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडच्या केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते.

बोदवडकडे माघारी परतत असताना अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातल्या उस्थळ दुमाला गावच्या हद्दीत आज (दि. ९) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागील बाजूला धडक दिल्याने क्रुझर गाडीमधील इतर ११ मुलं जखमी झाली.

जखमींवर नेवासा फाटा येथे उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, या अपघातात अकादमीचे एक शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा एक पाय निकामी झाल्याचं सांगितलं जात आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी