लोकपत डिजिटल मिडिया / अहिल्यानगर
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये मुस्लिम समाजाचे 100 पेक्षा जास्त तरुण कामावर घेण्यात आल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. त्याचबरोबर या देवस्थानमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा बनावट ॲप घोटाळा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदनही देण्यात आलं आहे.
दरम्यान, शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी मुस्लिम समाजाचे कर्मचारी कामावरुन काढून टाकावेत, यासाठी उद्या म्हणजे दिनांक 14 जून रोजी दुपारी चार सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, सागर बेग आणि तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ‘हे कर्मचारी काढून टाकण्यात येतील’, असं सांगण्यात आलं. मात्र तरीदेखील उद्याचं सकाळी हिंदू समाजाचं आंदोलन होणारच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तुम्हीच पहा, शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त आणि आंदोलक या संदर्भात काय म्हणताहेत.
आणि हो, पुन्हा एकदा तीच नम्र विनंती, लोकपत युट्युब चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ज्यायोगे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये येतील, त्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं या लोकपत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.