Saturday, May 10, 2025

शिर्डीतल्या अवैध धंद्यांवर अहिल्यानगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई…! २ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. नमूद आदेशाप्रमाणे पोनि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातले पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ अशांचे पथक तयार करून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केलं.

दिनांक 06/05/2025 रोजी पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेते व अवैध जुगार चालविणाऱ्या इसमांची माहिती काढुन, पंचासमक्ष 16 वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन अवैध व्यावसायिकांविरूध्द कारवाई केली.त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगारबंदी कायदयान्वये 7 व महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये 9 असे एकुण 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 2,02,360/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत 1 लाख 09 हजार 830 रुपये जुगार तर 92 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांनी केली.

दरम्यान, अहिल्यानगर एलसीबीनं केलेल्या या कारवाईमुळे शिर्डी आणि परिसरातल्या अवैध धंदेचालकांमध्ये प्रचंड खबर उडाली आहे. मात्र जी कारवाई अहिल्यानगर एलसीबीने केली, ती कारवाई शिर्डीचे स्थानिक पोलीस का करू शकले नाहीत, शिर्डीच्या स्थानिक पोलिसांचा या सर्व अवैध धंद्यांना वरदहस्त आहे का, अवैध धंदे करणाऱ्यांशी शिर्डीच्या स्थानिक पोलिसांनी हातमिळवणी केली आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या शिर्डीच्या स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला कारवाई करणार आहेत का, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी