लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
‘धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. तो मी स्वीकारलेला आहे. तो राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे’, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितलय. त्यामुळे हुकमी एक्का आता पायउतार झाला आहे. परंतु महाराष्ट्राला अजूनही एक प्रश्न सतावतो आहे. तो प्रश्न आहे, कृष्णा आंधळे कधी होणार जेरबंद?
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड
याच्यासह नऊ आरोपींना मोक्का कायद्याखाली अटक देखील झाली. त्यानंतर कोर्टात या सर्व हत्याकांडाचा सूत्र वाल्मिक कराड हाच असल्याचे उघडकीस आले. कोर्टात या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अखेर ही हत्या कशी झाले त्याच्या 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पुरावा सादर करण्यात आले आहेत. या फोटोंना पाहून आरोपींनी हैवानालाही लाजवले असे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी हैवानाला लाजवेल, असे काम केलं आहे.
सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणाले धक्कादायक खुलासे आणि फोटो समोर आल्यानंतर काल रात्री उशीरा राजकीय घडामोडना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराड याला सीआयडीने मुख्य आरोपी घोषित केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आणि अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला.
कृष्णा आंधळे हाजीर हो…!
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा ‘मास्टर माईंड’ वाल्मीक कराड हाच असल्याचं सीआयआडी तपासात समोर आलं आणि सोशल मीडियावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले. यामुळे साहजिकच जनक्षोभ प्रचंड वाढला. या हत्याकांडातले बहुतांश सर्वच आरोपी अटकेत असले तरी कृष्णा आंधळे
हा एकमेव आरोपी अद्यापही मोकाटच फिरतो आहे. त्याला अटक करण्याची आवश्यकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कृष्णा आंधळे अजूनही कोण पाठीशी घालत आहे, या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्यापही महाराष्ट्राच्या जनतेला मिळू शकलो नाही. असं असलं तरी कृष्णा आंधळे याला आता हजर व्हावं लागणारच आहे.