लोकपत न्यूज नेटवर्क / नागपूर / प्रतिनिधी
विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात प्रचंड असलेले गंभीर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या 24 तासांपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘तोच’ प्रयोग होतो की काय, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘नॉट रिचेबल’ होण्यामागे शरद पवार यांचीच ‘अदृश्य शक्ती’ तर काम करत नाही ना, अशीदेखील चर्चा या निमित्तानं होत आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार करताना महायुतीनं धक्कातंत्राचा वापर केला. परिणामी महायुतीच्या तीनही राजकीय पक्षातल्या इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांमध्ये मंत्रीपदावरुन प्रचंड नाराजी असल्याचं दिसून आलं.
या नाराजीनाट्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत, असं बोललं जात आहे. पवार यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ते बंगल्यावर नाहीत, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मंत्रीपद वाटपात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळहे देखील नाराज आहेत. आज (दि.१७) आणि उद्या नाशिकमध्ये ते त्यांच्या समर्थकांची बोलणार आहेत. या निमित्तानं समता परिषदेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.