Saturday, May 10, 2025

अबब! १० लाखांचा गांजा…! अहिल्यानगर एलसीबीनं पडलाय…! कुठं काय विचारता, सविस्तरपणे वाचा आणि घ्या जाणून…!

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर

अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला यांनी जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांची माहिती काढून त्या अवैध धंद्यांच्या विरुध्द कारवाई करण्याचे पो. नि. दिनेश आहेर,  स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिलेले आहेत. या आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातले पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, संतोष खैरे, रोहित मिसाळ, बाळासाहेब खेडकर, फुरकान शेख आणि प्रशांत राठोड अशांचे पथक नेमून जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांची माहिती काढत कारवाई करणेबाबत सुचना आणि मार्गदर्शन करुन या पथकाला रवाना केलं.

दि. 08/05/2025 रोजी हे पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, काळ्या रंगाची इको स्पोर्ट कार क्रमांक एमएच-15-ईक्यु-9222 आणि पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एमएच-17-सीएक्स-4466 अशा मधील चार इसमांनी दिनांक 07/05/2025 रोजी ओडीसा राज्यातून गांजा विक्रीसाठी आणला असून ते आज रोजी राहता ते शिर्डी रोडने जाणार आहेत.

या पथकाने मिळालेली माहिती पोनि नितीन चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच राहाता पोलीस स्टेशनचे पोनि/नितीन चव्हाण, पोसई/सोळंखे आणि पोलीस अंमलदार धिरज अभंग, अनिल गवांदे, प्रभाकर शिरसाठ, एस.एन.अनारसे अशांचे संयुक्त पथक तयार केले.

हे पथक पंच आणि आवश्यक साधनांसह मिळालेल्या माहितीवरून राहता ते शिर्डी रोडवर साकुरी शिवारातील हॉटेल समाधान येथे सापळा रचून थांबले.

काही वेळानंतर काळ्या रंगाची इको स्पोर्ट कार क्रमांक एमएच-15-ईक्यु-9222 आणि पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-17-सीएक्स-4466 असे वाहन एका पाठोपाठ येताना दिसल्या. या पथकाने दोन्ही वाहनांना थांबविण्याचा इशारा केला असता काळ्या रंगाच्या  इको स्पोर्ट कारवरील चालकाने वाहन रस्त्याचे कडेला पथकापासुन थोडे अंतरावर थांबविलं. त्यापाठीमागील स्वीफ्ट कार चालकाने कार न थांबविता भरधाव वेगाने निघून गेला. पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार इको स्पोर्ट कारकडे जात असताना वाहनातील एक इसम पळून गेला. वाहन चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने पोलीस आणि पंचाची ओळख सांगत (अरूण मोतीलाल विश्वकर्मा, वय 45, रा. गितराम सोसायटी, दत्तमंदीर, नाशिक रोड, नाशिक) यास ताब्यात घेतले. पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीची आणि त्याच्या ताब्यातल्या वाहनाची तपासणी करून घटनाठिकाणावरून 15,000/- एक मोबाईल, 2,66,360/- रू किं.त्यात 13 किलो 318 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ व 8,00,000/- रू किं.त्यात फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट कार क्रमांक एमएच-15-ई क्यु-9222 असा एकुण 10 लाख 81 हजार 360/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस पथकाच्या ताब्यातला आरोपी अरूण मोतीलाल विश्वकर्मा याच्याकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा मुद्देमाल हा नशेसाठी वापरला जात असून तो त्याचा साथीदार 2) नितीन उर्फ आण्णा जाधव, (रा.निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी, ता. राहाता)  (फरार) तसेच पळून गेलेल्या स्वीफ्ट कारमधील 3) साईनाथ उर्फ शिरीष गायकवाड, (रा. शिर्डी पूर्ण नाव माहित नाही)  (फरार) आणि 4) स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-17-सीएक्स-4466 वरील चालक (नाव माहित नाही) (फरार) अशांनी मिळून ओडीसा राज्यामध्ये जाऊन तेथील 5) जयराम (पूर्ण नाव माहित नाही) (फरार) यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल आणि स्वीफ्ट कारमध्ये असलेला 40 किलो गांजा खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली.

हे आरोपी हे अंमली पदार्थाचा मुद्देमाल खरेदी करून विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्यांच्याविरूध्द राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. 211/2025 एनडीपीएस ऍ़क्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी