लोकपत न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था
‘झुकेगा नहीं साला’, या डायलॉनं भल्याभल्यांना भुरळ पडली. मात्र पुष्पा या व्यक्तीची भूमिका साकारणाऱ्या आणि प्रत्यक्षात काहीसं वाकूनंच हा डायलॉग म्हणणाऱ्या पुष्पा अर्थात अल्लू अर्जुनच्या प्रेक्षकांसाठी ही काहीशी वाईट बातमी आहे. अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा एका चित्रपटगृहात शो सुरु होता. या शोच्या दरम्यान प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या या शोमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एक महिला ठार झाली. त्यामुळे पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली, असल्यास सांगितलं जात आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनची लोकप्रियता अलीकडच्या काळात प्रचंड वाढली आहे. दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याच्यापेक्षाही अल्लू अर्जुनला जास्त मागणी आहे. त्याचं बजेटदेखील प्रचंड मोठं आहे. मात्र सर्वसामान्य व्यक्तिरेखा साकारत असताना अल्लू अर्जुन करत असलेल्या दुर्बल घटकाचं प्रतिनिधित्व त्याच्या भुमिकेत दिसून येतं.
त्याच्या चाहत्यांमध्ये सध्या प्रचंड वाढ झाली आहे. मात्र अल्लू अर्जुन ला अटक करण्यात आल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.