लोकपत न्यूज नेटवर्क / शिर्डी / प्रतिनिधी
प्रसिद्ध अभिनेत्री कैटरीना कैफ हिने तिच्या सासूबाई विना कौशल यांच्यासोबत साई दरबारात हजेरी लावली. पांढऱ्या सूटमध्ये असलेल्या कॅटरिना कैफने साईबाबांच्या मूर्ती समोर हात जोडून माता टेकवत मनोभावे दर्शन घेतलं. यामुळे कॅटरिना कैफच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तर ‘परफेक्ट सून’ असेदेखील म्हटलं आहे.
कॅटरिना कैफच्या शिर्डी दर्शनाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. साईबाबांच्या मूर्तीसमोर डोके टेकून दर्शन घेत असल्याचे फोटो पाहिल्यानंतर कॅटरिना कैफच्या बद्दल आणि तिच्या नम्र स्वभावाबद्दल वेगवेगळी चर्चा सोशल मिडियावर वाचायला मिळत आहे .
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल नऊ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यावेळी ते त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशन साठी राजस्थानमध्ये गेले होते. या आठवणी कॅटरिना कैफ ने instagram वर लिहून ठेवल्या आहेत. जंगलात 48 तास घालवले असं तिनं त्यामध्ये लिहिलं आहे.