लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
‘मुलांची निरागसता आणि पालकांसमोर काही तरी सादर करण्याची त्यांची इच्छा हे प्रचंड आनंददायी आहे. जेव्हा ते हजारो लोकांसमोर तुमच्यासाठी काही तरी तरी सादर करतात, तेव्हा ते आनंद मोठे आनंददायी असतं’, अशा शब्दांत महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांची नात आराध्या तिचं कौतुक केलं.
दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत असताना सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा पाहायला मिळाली. मात्र या बातम्यांनंतर मुलीचा कार्यक्रम पाहण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्या हे दोघे पण पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे घटस्फोटाच्या या बातम्या अक्षरशः खोट्या ठरल्या आहेत.
आराध्या ही धीरूभाई अंबानी शाळेत शिकत आहे. शाळेचे वार्षिक समारंभाच्या एका नाटकात तिनं भाग घेतला होता. आराध्याचं नाटक पाहायला तिचे आई-वडील अर्थात अभिषेक आणि ऐश्वर्या आले होते. विशेष म्हणजे मुलांच्या कार्यक्रमानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी त्या ठिकाणी भरपूर डान्स केला होता.