लोकपत न्यूज नेटवर्क / नागपूर
दिवसेंदिवस तंत्रज्ञान इतकं प्रगत होत चाललं आहे, की बाजारात कधी कोणती वैशिष्ट्यपूर्ण वस्तू कशी विकायला येईल, कोण काय तयार करील, याचा काहीही भरवसा उरलेला नाही. अर्थात हे नवनवीन तंत्रज्ञान तुमच्या आमच्यासाठी सुलभ आणि सूटबल असं आहे. आता हेच पहा ना, फोल्ड होणारं हेल्मेट बाजारात येणार आहे. नाविन्यपूर्ण असलेलं हे हेल्मेट कुठे तयार झाले कोणी तयार केले त्याची रचना कशी असेल, याविषयी आता या बातमीत जाणून घ्या.
नागपूर विश्वविद्यातल्या एका शोधकर्त्याने फोल्ड होणाऱ्या या हेल्मेटचं डिझाईन स्केच केलं आहे. दुचाकी स्वरासाठी हल्मेट अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर असल्याचं सगितलं जात आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना हे हेल्मेट त्यांच्या दप्तरात घडी घालून ठेवता येणार आहे. नागपूर विश्वविद्यालयाच्या फिजिक्स डिपार्टमेंटच्या प्रा. डॉ. संजय ढोबळे आणि एम.एस.सी.ची विद्यार्थिनी अदिती देशमुख यांनी या हेल्मेट चा शोध लावला आहे.
दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीलाही नागपूर पोलिसांनी हेल्मेट सक्ती केल्यानंतर नागपूर विश्वविद्यालयातल्या एक प्राध्यापक आणि विद्यार्थिनीने हेल्मेट तयार केलं आहे. हे हेल्मेट दुचाकीच्या डिक्कीमध्येही घडी घालून ठेवता येणार आहे. हे हेल्मेट अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असणार आहे. या हेल्मेटला आय एस आय ट्रेडमार्क मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं प्रा. डॉ. ढोबळे यांनी सांगितलंय.