Wednesday, January 22, 2025

अवघ्या पंधरा गुंठ्यांच्या शेतीवर ‘हा’ शेतकरी झाला लखपती…! बघा, कशी केली प्रगती घ्या जाणून…!

लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

शेती परवडत नाही. शेती हा आतबट्ट्याचा धंदा आहे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. अशा पद्धतीचं रडगाणं आपण नेहमीच ऐकत असतो. परंतू, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या कांदळी गावच्या अनिल राधू कोकाटे

या प्रगतशील शेतकऱ्यानं अवघ्या पंधरा गुंठ्यांच्या शेतीवर लखपती होण्याचा विक्रम केला आहे. यासाठी या शेतकऱ्यानं नक्की काय केलंय, ते आता तुम्ही जाणून घ्या.

कोकाटे या प्रगतशील शेतकऱ्यानं सर्वप्रथम त्याची 15 गुंठे जमीन व्यवस्थित नांगरली. तत्पूर्वी त्या जमिनीत शेणखत टाकलं. नांगरणी केल्यानंतर पाळी घेतली आणि चार फुटाची सरी घातली. त्यानंतर मंचर येथून आणलेल्या कलकत्ता व्हाईट बंगलोर जातीच्या शेवंतीच्या 2 हजार 700 रोपांची जून महिन्यात सव्वा फुटांच्या अंतरावर लागवड केली.

कोकाटे यांनी यासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता फक्त सेंद्रिय खतांचाच वापर केला. तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. फुलांच्या वजनाने झाडं वाकू नये, यासाठी बांबूच्या सहाय्यानं मांडव केला. शेवंतीच्या फुलांना आज प्रचंड मागणी असल्यानं कोकाटे शेतकऱ्याचा लखपती होण्याचा निर्धार पूर्ण झाला आहे. राज्यातल्या कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी कोकाटे यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी