लोकपत न्युज नेटवर्क / नवीदिल्ली / प्रतिनिधी
स्वतःची कार असावी, असं प्रत्येकाचे स्वप्न असतं. मात्र महागाईच्या दुनियेत कार खरेदी करायला आणि तिचा मेंटेनन्स ठेवायला तसंच इंधन खर्च पेलवायला हिम्मत लागते. कारण वाढत्या महागाईमुळे घरासमोर कार असावी, हे स्वप्न अधुरं राहतं. परंतु अवघ्या एक लाख रुपयात तुम्हाला कार मिळणार आहे. तर 17 हजारांत स्कुटी मिळणार आहे. त्यामुळे यासाठी काय करावं, लागेल हे जाणून घेण्यासाठी आमची ही बातमी सविस्तरपणे वाचा.
भारतातल्या प्रसिद्ध नामांकित मारुती सुझुकी, टोयाटो, फोर्ड, ह्युंदाई या कंपन्यांच्या कार्स माफक दरांत विकत घेण्याची संधी तुम्हाला चालून आली आहे. बँकेने ओढून आणलेल्या या गाड्यांविषयी आम्ही आता तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत.
बरेच लोक बँकेकडून कर्ज घेऊन गाड्या घेत असतात. मात्र त्यापैकी काहीच लोक हप्ते भरतात. अनेकांचे हप्ते थकलेले असतात. चांगल्या अवस्थेतल्या या गाड्या बँक जप्त करते. मात्र या गाड्या ठेवून बँक काय करणार आहे?
बँका यासाठी वेळोवेळी अशा गाड्यांचा लिलाव जाहीर करत असतात. या वाहनांची स्थिती इतर वाहनांपेक्षा चांगली असते. मात्र अशा गाड्यांची खरेदी करताना एक्सपर्टकडून माहिती घेऊनच पुढची प्रक्रिया करावी. जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही. देशभरात वेगवेगळ्या बँका गाड्यांचा लिलाव करत असतात. त्याची माहिती घेऊन तुम्ही कार खरेदीचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता.