लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
राहुरी तालुक्यातल्या मानोरीच्या आढाव दांपत्याचा मागच्या वर्षी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी माफीचा साक्षीदार करण्यात आलेल्या हर्षल दत्तात्रय ढोकणे याला पश्चाताप झाला आहे. हा गुन्हा कशा पद्धतीने केला, याची त्याने अहिल्यानगरच्या कोर्टाला माहिती दिली.
आढाव याने सांगितलं, की ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचं अपहरण केल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घालून त्यांचे हात आणि पाय साडीने बांधले. दगडाची गोणी बांधून आढाव दाम्पत्याला उंबरे गावाजवळच्या विहिरीत टाकून दिलं, अशी कबुली हर्षल ढोकणे याने अहिल्यानगरच्या कोर्टासमोर दिली.
आरोपीच्या वकिलाकडून हर्षल ढोकणे याची तपासणी सुरू झाली आहे. न्यायदंडाधिकारी यांनी नोंदविलेला जबाब वाचून पाहिल्याचं ढोकणे यानं सांगितलं. 27 जानेवारी 2024 पर्यंत पोलिसाच्या ताब्यात असल्याचंही त्यानं सांगितलं.
दरम्यान, राहुरीतल्या आढाव वकील दांपत्याच्या खूनप्रकरणी अहिल्यानगर एलसीबीच्या पोलिसांनी मुख्य आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, भैय्या उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे या आरोपींना अटक केलेली आहे. या खून खटल्याची आज (दि. ११) पुन्हा सुनावणी होणार आहे.