लोकमत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
आपला भारत देश फक्त म्हणायलाच कृषिप्रधान देश राहिला आहे. आपल्या या भारत देशात शेतकऱ्यावरच अनेक प्रकारचा अन्याय सुरु आहे. रात्रंदिवस मेहनत करुन बळीराजांनी पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव नाही. दुसरीकडे दलालाचे मात्र बंगल्यावर बंगले उभे राहत आहेत. अहिल्या नगर जिल्ह्यात एका शेतकऱ्यावर उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. विशेष म्हणजे हा शेतकरी भाजपचा कार्यकर्ता आहे.
या शेतकऱ्याच्या जमिनीवर भलत्याच माणसाने कर्ज काढलंय. तब्बल अकरा लाख रुपयांचं हे कर्ज प्रकरण असून याविषयी या शेतकऱ्याला अजिबात कल्पना नव्हती. मात्र पतसंस्थेचे लोक दारात आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि संबंधित शेतकऱ्याच्या तळपायची आग मस्तकापर्यंत गेली.
काय चाललंय, आपल्या देशात हेच कळायला तयार नाहीत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या जनतेला काही प्रश्न पडले आहेत. अहिल्यानगरचं महसूल प्रशासन झोपलंय का? जिल्हा आणि तालुका उपनिबंधक तरी जागे आहे ना? तर मग आठ दिवस उलटूनही उपोषणकर्त्या शेतकऱ्याला न्याय का नाही…? असे ते प्रश्न आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातले आमचे सहकारी आणि ‘महासत्ता भारत’ न्यूज नेटवर्कचे संपादक भारत पवार यांनी पिडित शेतकऱ्याशी केलेली ही बातचीत तुम्ही नक्की ऐका…!