Saturday, April 26, 2025

अहिल्यानगरचं रंगभवन पाडलं जाणार…! आमदार संग्राम जगताप यांनी केला पाठपुरावा…!

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कार्यक्रमांची आठवण असलेलं अहिल्यानगरच्या सर्जेपुरा परिसरात असलेलं अजरामर असं रंगभवन आता पाडले जाणार आहे. या परिसरात सांस्कृतिक सभागृह आणि पार्किंगची व्यवस्था असलेल्या बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे. अहिल्या नगरचे आमदार संग्राम जगताप

यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता.

अहिल्यानगर शहरासह बाजारपेठेतल्या पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संकुलातल्या तीन मजल्यांवर 380 दुचाकी आणि 90 चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तत्कालीन नगरपरिषदेच्या कालावधीमध्ये 27 गुंठे जागेत हे रंगभवन उभारण्यात आलं असून या संकुलात तळमजल्यावर 18 गाळे आहेत.

या रंगभवनच्या नाट्यमंचची दुरावस्था झाली असून त्याचा वापरही बंद आहे. पहिल्या मजल्यावरचं कार्यालयदेखील बंद आहे. या जागेवर एफबीटी तत्त्वानुसार नवीन व्यापारी संकुल बांधण्याचा दि. 21 जून 2010 च्या ठरावानुसार निर्णय घेण्यात आला होता. मात्र मात्र अद्याप पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे अहिल्यानगर शहरात बहुमजली पार्किंग असलेलं संकुल पहिल्यांदाच होणार आहे.

वाहन पार्किंगचा प्रश्न सुटणार…!

दिवाळी, रमजान आणि ख्रिसमस (नाताळ) या सणांच्या खरेदीसाठी अहिल्या नगरच्या एमजी रोड परिसरात असलेल्या कापड बाजारात दरवर्षी प्रचंड गर्दी होत असते. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या मोठी असते. परिणामी पायी चालणाऱ्या नागरिकांनादेखील मोठी कसरत करावी लागते. परंतु अहिल्यानगरच्या सर्जेपूरा भागात असलेल्या रंगभवजागेवरच्या जागेवर बहुमतली संकुल झाल्यास ही समस्या मार्गी लागणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून महत्वाच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहनं लावण्याचा प्रश्नदेखील यामुळे सुटणार आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी