Friday, January 24, 2025

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ साहेब! भूमी अभिलेख कार्यालयातलं रेकॉर्ड नष्ट करणाऱ्या निमतानदाराविरुद्ध कारवाई होईल का? हातावर हात धरुन बसलेल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी आपण कराल का?

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर 

सन 2013 ते 2019 दरम्यान अहिल्यानगर शहरातल्या नगर-पुणे बसस्थानकासमोरच्या गांजा डेपो परिसरात असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयातून निमतानदार २ या पदावर कार्यरत असलेल्या इसमाकडून या कार्यालयातली महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाली आहेत. या कार्यालयाच्या तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पल्लवी सचिन मुसळे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

दरम्यान, या कार्यालयाचे सध्याचे जबाबदार अधिकारी असलेले अविनाश मिसाळ हे फक्त पोलीस तपासावरच विसंबून राहिले आहेत. वास्तविक पाहता मिसाळ यांनी 2013 ते 2019 या दरम्यान निमतानदार या पदावर कार्यरत असलेल्या इसमाची माहिती घेऊन चौकशी करणं अपेक्षित होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. या संदर्भात मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, ‘हा प्रकार खूप जुना आहे. त्यावेळी कोण होतं, हे मला माहित नाही. त्यावेळी निमतानदार २ या पदावर असलेल्या इसमाला शोधणं अवघड आहे’.

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

यांना आमचा जाहीर सवाल आहे, की अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयातलं रेकॉर्ड नष्ट करणाऱ्या निमतानदाराविरुद्ध कारवाई होईल का? हातावर हात धरुन बसलेल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी आपण कराल का? कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी मिसाळ यांनी आतापर्यंत विभागीय किंवा कार्यालयीन चौकशीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे का सादर केला नाही, मिसाळ हे नक्की कोणाला पाठीशी घालत आहेत, हाच खरं तर संशोधनाचा विषय आहे. 

बातम्या थांबविण्याचा ‘असा’ही प्रयत्न…!

अहिल्यानगर भूमी अभिलेख कार्यालयातली कागदपत्रं गहाळ झाल्यासंदर्भात ‘लोकपत’नं सुरु केलेल्या बातम्या थांबविण्यासाठी आजही (दि. २४) आटोकाट प्रयत्न करण्यात आला. आमच्या एका जवळच्या मित्रावरच ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या मित्राने मोबाईलवरुन आम्हाला स्पष्ट विचारलं, तुमचं ‘ते’ माझ्याकडे ठेवून घेऊ का?  आम्हीही त्या मित्राला तितकंच स्पष्टपणे सांगितलं, ‘गेल्या 26 वर्षांपासून आम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून असा कुठलाही ‘उद्योग’ आतापर्यंत केला नाही आणि करणारदेखील नाही. आम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहोत, समाधानी आणि संतुष्ट आहोत. ज्यांनी तुम्हाला पाठवलंय, त्यांना सांगा, तुमच्या अवतीभवती असलेल्या टोळक्यांना आवरा. सामान्य जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा ‘लोकपत’ भूमि अभिलेखच्या गलथान कारभारावर वृत्तमालिका सुरु करील. ही धमकी नसून आमचा इशारा आहे’.  

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी