Thursday, January 23, 2025

अहिल्यानगरच्या एमआयडीसीत गैरव्यवहार! उद्योगमंत्री उदय सामंत, उघडा डोळे बघा नीट…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर /  प्रतिनिधी

अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्राचे उपअभियंता संदीप बडगे यांची कार्यालयीन तसेच त्रिपक्षीय चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंधेरी पूर्व (मुंबई)च्या कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं अहिल्या नगरच्या या एमआयडीसीत होत असलेल्या गैरव्यवहाराकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. संभाजी ब्रिगेडच्या या तक्रारीसह अनेकांच्या अहिल्यानगर एमआयडीसी संदर्भात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. याकडे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी डोळे उघडे ठेवून नीट पहावं, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.  

या निवेदनात म्हटलं आहे, अहिल्यानगरच्या एमआयडीसीचे उप-अभियंता (कामे उपविभाग) संदीप बड़गे यांनी केलेल्या गैरवहाराची कार्यालयीन त्रिपक्षीय चौकशी करावी. बडगे यांनी मागील एक ते दीड वर्षांत करोडो रुपयांचा आर्थिक अपहार केलेला आहे. यामाध्यमातून महामंडळाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केलेली आहे.

संदीप बडगे हे कार्यालयात कर्मचा-यांसह इतर अधिका-यांना तसेच कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना अरेरावीची भाषा करीत आहे.

मापारी इन्फ्रास्ट्रक्चर, मौजे नांदगांव डब्ल्यूटीपीने एम. आय. डी. सी. अहिल्यानगर येथील पाईपलाईनचे 38 कोटी रुपये खर्च काम करत असताना संदीप बडगे यांच्या संगनमताने गैरव्यवहार केला असल्यास या निवेदनात म्हटलं आहे. या कामात नांदगाव ते डब्ल्यूटीपीचे वॉल, जुने पाईप यांचे सद्यस्थिती मार्केट रेट यांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. बडगे यांनी सदर कामात पीसीसी हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं आहे. तसेच जेथे काँक्रीटीकरण झाले आहे तेथे कोणत्याही प्रकारचे खाली बार वापरलेले नाहीत. तरीसुध्दा त्यांना संपूर्ण बील अदा करण्यात आलेले आहे.

संदीप बडगे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोडी करून केले आहे. तरी मोजे सांदगाव ते डब्ल्यूटीपी इथपर्यंत झालेल्या पाईपलाईनचे स्टिल, सिमेंट काँक्रीट चेक करुन संबंधित अधिकारी संदीप बडगे यांच्याविरुध्द कारवाई करण्यात यावी.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागापूर येथे सन फार्मा कंपनी ते सह्याद्री चौकापर्यंत पेव्हींग ब्लॉक बसवितांना पूर्ण एक पूल गायब झाला आहे. त्याचासुध्दा शोध घेण्यात यावा. सदर पूल हा ठेकेदाराने उपअभियंता संदीप बडगे यांच्या संमतीने गायब केला, याचीसुध्दा चौकशी करण्यात यावी.

सदर ठेकेदाराने पूल गायब केला असतांनासुध्दा या कामाचे संपूर्ण बील संदीप बडगे, उप अभियंता यांनी अदा केलेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, नागापूर, अहिल्यानगर येथील नवीन सुपा तसेच श्रीरामपूर औद्योगिक क्षेत्रात संदीप बडगे यांनी एका ठेकेदाराकडून १२ गुंठे जमीन, एक नवीन आयफोन मोबाईल आणि आयफोन कंपनीचा लॅपटॉप घेतला आहे.

सदर महामंडळाच्या निवासस्थानी राहत असलेल्या कॉर्टरमध्ये बडगे यांनी स्वतःसाठी महामंडळाला न विचारता ठेकेदाराकडून ए. सी. बसवून घेतला आहे. या सर्व गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आमदार संग्राम भैय्या जगताप यांचंही याकडे होतंय दुर्लक्ष…! 

अहिल्यानगरची एमआयडीसी शहराचा आर्थिक कणा आहे. या एमआयडीसीमध्ये राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या मोठ्या नामांकित कंपन्यांनी आर्थिक गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. ज्यायोगे या शहर आणि परिसरातल्या तरुणांना रोजगार मिळू शकेल. मात्र इथे सुरू असलेल्या ठेकेदारांच्या मनमानीमुळे याठिकाणी नवनवीन उद्योगांची उभारणी होणं अवघड होऊन बसलं आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याप्रमाणेच अहिल्या नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप

यांचेदेखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी