लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावात ज्या पद्धतीनं गुंडगिरीचा वापर करत वाळू, मुरुम या गौण खनिजाची तस्करी सुरु होती, अगदी तसाच प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बाबुर्डी बेंद या गावात पाहायला मिळाला आहे. या गावातल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीतून हजारो डंपर्स मुरमाची तस्करी करण्यात आली आहे.
याप्रकरणी अमोल भाऊसाहेब चोभे यांनी सुरज भाऊसाहेब कोठुळे आणि इतरांविरुद्ध अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी याठिकाणी निवेदन दिलंय.
या संदर्भात अमोल चोभे यांनी लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत youtube चॅनलशी बोलताना सविस्तर हकिकत सांगितलीय. गुंडगिरीच्या बळावर बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावात ज्या पद्धतीनं गौण खनिजची तस्करी केली जात होती, त्याच पद्धतीनं सुरज कोठुळे आणि इतरांनी गुंडगिरीची भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप चोभे यांनी केलाय.
चोभे यांचं नक्की काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि लोकपत youtube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ राज्यभर व्हायरल करा.