लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या आरटीओ कार्यालयाचे प्रमुख अधिकारी सगरे यांना बहुउद्देशीय वाहतूक चालक-मालक माथाडी मंडळाच्या शिष्टमंडळानं दिनांक 21 डिसेंबर रोजी पत्र दिलं होतं, की या कार्यालयाच्या कार्यालयीन कामकाजासंदर्भात गंभीर आरोप करण्यासाठी अहिल्यानगर आरटीओचे प्रमुख सगरे यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी बहुउद्देशीय वाहतूक चालक-मालक माथाडी महामंडळाच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ द्यावा. मात्र या संदर्भात सगरे यांनी संबंधित शिष्टमंडळाला कुठलीही वेळ न देता दोन दिवस आधीच म्हणजे दिनांक 13 जानेवारी रोजी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे या शिष्टमंडळाला अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन या शिष्टमंडळाच्यावतीने अहिल्यानगर आरटीओसंदर्भात करण्यात आलेले गंभीर आरोप ऐकून घेतले. त्यामुळे अहिल्यानगर आरटीओचे प्रमुख अधिकारी सगरे यांना जाहीर सवाल आहे, की अहिल्यानगर आरटीओचे सगरे साहेब, कलेक्टर आणि एसपींपेक्षा तुम्ही मोठे आहात का? वाहतूक चालक-मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला सामोरं जाण्याऐवजी तुम्ही चक्क रजेवर गेलात. 15 जानेवारीला असं कोणतं महत्त्वाचं काम तुम्हाला आलं होतं?
या संघटनेचे अध्यक्ष असलेले डॉ. एल. जी. पांडुळे यांनी अहिल्यानगरच्या आरटीओ कार्यालयाच्या आवारातच पत्रकार परिषद बोलावली आणि या पत्रकार परिषदेला हजर असलेल्या पत्रकारांशी बोलताना डॉ. पांडुळे यांनी नगर आरटीओच्या कारभारा संदर्भात गंभीर स्वरुपाचे आरोप केले. तुमच्या काही तक्रारी असल्यास निकाळजे यांच्याशी (मो. नं. 095792 47622) संपर्क साधावा. एकूणच काय आहेत ते आरोप, याविषयी आम्ही खाली व्हिडिओची जी लिंक दिलेली आहे, ती ओपन करून तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये असा एक व्हिडिओ आहे, की ज्या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिसांविषयी सरकारने विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे धोरण हाती घेतलं आहे, त्याबद्दल देखील चर्चा करण्यात आली आहे. तुम्हीच पहा, तो व्हिडिओ.
हे अहिल्यानगर आहे बीड नाही…!
सरकारी यंत्रणांनी पोसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते, हे बीडच्या उदाहरणावरुन स्पष्ट झालं आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही. पण काळ सोकवता कामा नये, या विचारानुसार प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यानं काम केलं तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहते. मात्र स्वतःचं काम दुसऱ्यावर ढकलून केवळ पैसे कमविण्यासाठी एजंटाची फळी उभी करणं, हे भविष्यात सर्वांसाठीच घातक ठरणार आहे. नगरच्या आरटीओने हे लक्षात घ्यावं, की हे अहिल्यानगर आहे, बीड नाही.