लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर आरटीओच्या कारभारासंदर्भात वाहतूक चालक-मालक संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीनं नुकत्याच तीन-चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंभीर आरोप करण्यात आले. या गंभीर आरोपांनंतरसुद्धा अहिल्यानगर आरटीओचे अधिकारी अक्षरशः मूग गळून गप्प बसले आहेत. एवढे गंभीर आरोप होऊनसुद्धा जर खुलासा करण्यात आला नाही तर आरटीओच्या आरटीओ च्या अधिकाऱ्यांनी जे मौन बाळगले आहे मौनाचा अर्थ काय समजायचा? म्हणूनच आमचा जाहीर सवाल आहे, की अहिल्यानगर आरटीओचे सगरे साहेब, ‘त्या’ गंभीर आरोपांनंतरसुद्धा तुम्ही गप्प का आहात? आरोपांचा खुलासा करण्यासाठी कधी घेताय पत्रकार परिषद?
आरटीओ कार्यालय ही सरकारी यंत्रणा आहे. या सरकार यंत्रणेवर करण्यात आलेले आरोप खरे की खोटे, आरोप करणाऱ्यांकडे जर एवढे पुरावे असतील तर त्यांचा आरोपात नक्कीच काही तरी तथ्य आहे, हे उघड सत्य आहे. ज्या अर्थी या संघटनेने पुराव्यासह मोठ्या आत्मविश्वासाने अहिल्या नगरच्या आरटीओ कार्यालयाचा जो कारभार आहे त्या कारभारावर गंभीर आरोप केले, ते आरोप अहिल्यानगर आरटीओ चे सगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फेटाळून लावल्याचं अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. नगर आरटीओ मूग गिळून गप्प आहेत, याचा अर्थ हे आरोप या सर्वच अधिकाऱ्यांना मान्य आहेत का, हेच नगरच्या जनतेने समजायचं का, हा मोठा प्रश्न आहे.
अहिल्यानगर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात एजंटगिरी चालते, त्यामध्येसुद्धा अनेक प्रकारच्या ‘आकां’चा समावेश आहे. मात्र या सर्वच ‘आकां’चं नियंत्रण कोणाकडे आहे, एजंटांमार्फत गोळा होणारा ‘मलिदा’ कुठपर्यंत जातो, या भ्रष्टाचाराचा कोणाकोणाचे हात बरबटलेले आहेत, या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून दर महिन्याला किती कोटी रुपये जमा होतात, हे सारे रुपये सरकारच्या तिजोरी जमा होतात का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘लोकपत’ न्यूज नेटवर्क लवकरच वृत्तमालिका सुरु करणार आहोत. यासंदर्भात आपले काही अनुभव असतील तर नक्कीच त्या अनुभवाचा आम्हाला आणि सामान्य माणसाला फायदाच होईल. तेव्हा न विसरता संपर्क करा.