Monday, April 28, 2025

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत ‘एसीबी’चा ‘ट्रॅप’ यशस्वी…! ‘प्रॉव्हिडंट फंड’ची ‘फाईल’ मंजूर करण्यासाठी मागितली 20 हजारांची लाच…! सहाय्यक लेखाधिकारी अशोक शिंदेला रंगेहाथ पकडलं…! …!

शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही प्रॉव्हिडंट फंड मिळाला नसल्यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वेतन आणि भविष्य निर्वाह विभागात सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या शिक्षकाकडून प्रॉव्हिडंट फंड मंजूर मिळावा, यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली आणि सदर लाच घेताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याला रंगेहाथ हात पकडलं. काल (दि. १८) रात्री बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

अशोक मनोहर शिंदे (वय – 49, सहाय्यक लेखाधिकारी, (वर्ग-२) वेतन व भविष्य निर्वाह विभाग , जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, अहिल्यानगर, राहणार – तुळसाई पार्कच्या पाठीमागे, गावडे मळा, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर) असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. 

तक्रारदार हे शिक्षक असून ते दिनांक 03/06/2022 रोजी शिक्षकी पैशातून सेवा निवृत्त झाले आहेत.परंतु तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांना प्रोव्हिडंड फंड आज अखेर मिळालेला नाही. त्याकरीता तक्रारदार हे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयात काम करणारे आलोसे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन पाच सहा वेळेस समक्ष भेट घेतली असता त्यावेळी आलोसे यांनी तक्रारदार यास म्हणाले की, तुमचे काम खुप जुने असून ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून 20,000 रुपये द्यावे लागतील.

याबाबतची तक्रार दि.18/02/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि. 18/ 02/ 2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांची प्रोव्हिडंड फंडची फाईल पास करण्यासाठी लाचेचा पहिला हप्ता पंचांसमक्ष मागणी केली. दि.18/02/2025 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग अहिल्यानगर येथे सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून आलोसे यांनी पंचा समक्ष 8, 000/- रुपये लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी