लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गहू आणि ज्वारीच्या पेरणीत 74% घट दिसून येत आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत 3 कोटी 92 लाख हेक्टरवर गहू आणि ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उत्पादनासह पेरणीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
यावर्षी समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मराठवाड्याला पाणी देण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे नगर जिल्ह्याला पाटपाण्याचा एक जादा आवर्तन मिळणार आहे. यावर्षी 1 लाख 44 हेक्टरवर ज्वारी तर 86 हजार 330 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.
नेवासा तहसीलदार साहेब, युरिया विक्रीच्या घोटाळ्याकडे लक्ष द्याल का?
गव्हाची पेरणी झाल्यानंतर आता नुकत्याच उगवलेल्या गव्हाला युरिया खत टाकण्याची शेतकरी बांधवांची लगबग सुरू आहे. मात्र युरिया विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली जात आहे नॅनो युरियाची 250 रुपयांची एक बाटली बळजबरीने गरज नसताना शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे. नेवाशाचे तहसीलदार याकडे लक्ष देतील का, खत विक्रेत्यांना ताकीद देतील का, अशी विचारणा शेतकरी बांधवांमधून केली जात आहे.