लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
घरपट्टी पाणीपट्टी या संकलित करांच्या वसुली संदर्भात सामान्य माणसाला एक नियम आणि श्रीमंतांना अर्थात ‘बड्या धेंडां’ना दुसराच नियम लावण्याचा प्रताप अहिल्यानगर महापालिका प्रशासन करताना दिसत आहे. पाणीपट्टी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त थकविल्याची अहिल्यानगर शहर आणि उपनगरात पुष्कळ अशी उदाहरणं सापडतील. मात्र महापालिका प्रशासन अशा ‘बड्या धेंडां’कडे दुर्लक्ष असल्याची चर्चा करत आहे. या पार्श्वभूमीवर आमचा जाहीर सवाल आहे, की अहिल्यानगर महापालिका आयुक्त यशवंत डांगे साहेब, घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसंदर्भात ‘बड्या धेंडां’ना पायघड्या कशासाठी? अहिल्यानगर शहर आणि परिसरातल्या नळ ‘कनेक्शन’चं ‘ऑडिट’ करणार का?
अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या कामाचा सध्या मोठा धडाका सुरु आहे. अर्थात याबद्दल त्यांचे कौतूक आणि अभिनंदन करायलाच हवं. मात्र त्यांचे सहकारी असलेले महापालिका अधिकारी सामान्य नागरिकाला एक नियम आणि ‘बड्या धेंडां’ना दुसराच नियम लावत असतील आणि त्यातून सामान्य नागरिकांना मनस्ताप होत असेल तर या प्रकाराला जबाबदार कोण? अहिल्यानगर आणि शहर परिसरातल्या नळ ‘कनेक्शन’चं ‘ऑडिट’ करण्याचं धाडस महापालिका आयुक्त डांगे दाखवतील का?
महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी दोन दोन नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुख्य जलवाहिनीला हे कनेक्शन जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरी 24 तास पाणीच पाणी तर सामान्य नगरकरांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत असून महिला भगिनींना भल्या पहाटे उठून पाणी भरण्यासाठी धडपड करावी आहे. अनेक ठिकाणी पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी येत नाही, तरीही पाणीपट्टी पात्र नगरकरांना न चुकता भरावी लागते. अशा परिस्थितीत सामान्य नगरकर यांच्या व्यथा आयुक्त डांगे यांनी जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.
बातम्यांसाठी संपर्क :
बाळासाहेब शेटे पाटील (संपादक) लोकपत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर
मोबाईल नंबर
70 28 35 17 47