लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहर आणि परिसरातले तब्बल 41 ओळी आणि नाले गायब आहेत. किंबहुना त्या नाल्यांवरच बांधकामं करण्यात आली आहेत. अहिल्यानगर शहरातले खऱ्या अर्थाने यांना जागरुक नागरिक असे म्हणता येईल, असे ‘अँग्री अँड मॅन’ शशिकांत चंगेडे हे या विषयासंदर्भात अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले चंगेडे काका या महत्त्वाच्या मुद्यावर एकाकी संघर्ष करत आहेत. चंगेडे काका यांनी या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे चंगेडे काका यांच्या या प्रश्नाचे उत्तर देतील का? या महत्त्वाच्या मुद्यांसंदर्भात कर्तव्यात कसूर करणारे नगर असताना विभागाचे तत्कालीन प्रमुख चारठाणकर यांच्याविरुद्ध कारवाई होईल का, अशा प्रश्नांच्या उत्तरांची नगरची जनता चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.
चंगेडे काका यांनी आयुक्त डांगे यांना दिलेल्या पत्राद्वारे जे 11 मुद्दे उपस्थित केले आहेत, त्या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, की अहिल्यानगर शहराने परिसरातल्या ओढ्या आणि नाल्यांची 15 मेच्या आधी आणि नंतर पाहणी करणं आवश्यक आहे. 41 ओढे आणि नाल्यांवर दरवर्षी शासकीय अनुदानातून केलेल्या खर्चाचा तपशील चंगेडे काका यांनी मागितला आहे. या पत्रात बरेच गंभीर मुद्दे चंगेडे काका यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व मुद्द्यांची किंवा प्रश्नांची उत्तरं अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे येथील का, हाच खरा प्रश्न आहे.
ताजा कलम :
चंगेडे काका यांनी उपस्थित केलेले अकरा मुद्दे आणि गायब झालेले 41 ओढे नाले या महत्त्वाच्या परंतू गंभीर विषयासंदर्भात उद्या ( दि. 18) आम्ही (लोकपत न्यूज नेटवर्क & लोकपत यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर) प्रत्यक्षपणे चंगेडे काका यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.