Monday, April 28, 2025

अहिल्यानगर महापालिकेचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान…! रविंद्र वखारे यांनी केली लोक आयुक्तांकडे तक्रार…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

अहिल्यानगर महापालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी अहिल्यानगरचे रवींद्र वखारे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. या संदर्भात वखारे यांनी लोक आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच दखल घेत लोक आयुक्तांनी सुनावणीदेखील घेतली. मात्र महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी पाच प्रकरणांपैकी फक्त एकाच प्रकरणासंदर्भात उत्तर दिल्याचे वखारे यांचं म्हणणं आहे. उर्वरित चार प्रकरणांची उत्तरं वखारे यांना मिळालेली नाहीत.

यासंदर्भात वखरे यांनी सांगितलं, की अहिल्यानगर महापालिकेच्या मार्केट विभागातले प्रकरण क्रमांक 1 गाळे एकत्रिकरण करण्याकामी दंड रक्कम रुपये प्रत्येकी 20 हजार याची टाचण पब्लिक भाडे रजिस्टरला नोंद न घेतल्यामुळे संस्थेची अंदाजीत रक्कम रुपये 30 ते 40 लाख इतकी आर्थिक नुकसानीबाबत,  प्रकरण क्रमांक 2 रस्ता बाजू फी वसुली प्रकरणी संस्थेचे अंदाजे रक्कम रुपये 32 लाख इतक्या आर्थिक नुकसानीबाबत, प्रकरण क्रमांक 3 मनपाने दिलेल्या मोकळ्या जागा व गाळे याची भाडे रजिस्टरला नोंद न घेतल्यामुळे संस्थेचे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत व्ही. व्ही. माने यांची चौकशी करण्याकामी संस्थेचे झालेले आर्थिक नुकसान रुपये वीस लाख इतके वसूल करणे कामी,  प्रकरण 4 इथापे. एस. के यांनी प्रोफेसर कॉलनी येथील गाळयांना भाडेवाढ करण्याबाबत तीन वर्षे झाली तरी अभिप्राय न दिल्यामुळे संस्थेचे झालेल्या आर्थिक नुकसान 87 लाख आणि प्रकरण क्रमांक 5 मेहर लहारे, आढाव यांनी लोक आयुक्त मुंबई, यांना खोटा अभिप्राय दिल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मी दिनांक 25/ 9 /2023 ,2/1 / 2023, 17 सप्टेंबर 2024 रोजी पुराव्यांसह तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

 अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त यशवंतराव डांगे आणि सचिन बांगर यांची सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी करणे कामी नेमणूक करुनसुद्धा त्यांनी अद्यापपर्यंत चौकशी अहवाल दिलेला नाही. नियमानुसार दोन महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करणे आवश्यक असताना ती पूर्ण केली नाही. पावसे, गुंजाळ, सोनवणे, इथापे यांची आर्थिक नुकसानीबाबत चौकशी चालू असतानासुद्धा व मी त्यांची आर्थिक प्रकरणी चौकशी चालू आहे, त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ देऊ नये, असे तक्रार अर्ज दिलेले असतानासुद्धा तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पठारे पी. व्ही, श्रीनिवास कुरे, अशोक साबळे, श आढाव, मेहेर लहारे यांनी माझ्या तक्रार अर्जाची दखल न घेता वरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ दिलेले आहेत.

 

या सर्व गंभीर चुकीमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मी (रविंद्र वखारे) केलेल्या तक्रार अर्जाची लोक आयुक्त यांनी दखल घेतली आहे.  सदर प्रकरणी लोक आयुक्त यांच्या समक्ष दिनांक 3/3/ 2025 रोजी रोजी सुनावणी झाली असता सदर सुनावणीस मी स्वतः हजर होतो. तसंच आयुक्त यशवंतडांगे हे हजर होते. परंतू ते वरील पाच प्रकरणांपैकी फक्त एकाच प्रकरणाची माहिती घेऊन आले होते. कारण बाकीच्या उपकरणाचे माझे अर्ज मार्केट विभागात आढळून येत नाहीत. म्हणून उर्वरित चार प्रकरणांबाबत डांगे  हे माहिती देऊ शकले नाहीत.

लोक आयुक्त यांना पाचही प्रकरणांबाबत मी लेखी म्हणणे पुराव्यासह सादर केलेले आहे. त्याबाबत पुढील तारीख देण्यात येईल, असे समक्ष सांगितले गेले. लोक आयुक्त यांनी मी सादर केलेल्या पाचही प्रकरणांबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे.  तसेच तत्कालीन मार्केट जोशी, डी. आर. सोनवणे, आर. डी. वाळेकर, विजयकुमार बालानी यांनी वरील पाच प्रकरणांपैकी तीन प्रकरणे उपायुक्त यांच्या मान्यतेनंतरसुद्धा पुढील कारवाईसाठी आयुक्त यांच्याकडे दाखल न करता ती प्रकरणे दाबून ठेवली आहेत. सदर प्रकरणी माने, गुंजाळ, रासकर, करवरे,दुबे, पावसे, टेमक, आकुबत्तीन, अशोक साबळे, मेहेर लहारे, अंशुमन आढाव तसंच मनपा अधिकारी / कर्मचारी व शासनाचे अधिकारी पी. व्ही. पठारे, यशवंतराव डांगे, सचिन बांगर, श्रीनिवास कुरे यांच्यावर लोक आयुक्त हे मी दिलेल्या पुराव्यांनुसार इच्छित कार्यवाही करतील, अशी मला अपेक्षा आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी