Monday, April 28, 2025

अहिल्यानगर महापालिकेचा कचराडेपो आणखी किती वेळा जळणार आहे? कचराडेपोला आग लागली की लावण्यात आली? आयुक्त यशवंत डांगे, सखोल आणि नि:पक्षपातीपणे चौकशी कराल का?

बाळासाहेब शेटे पाटील 

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचराडेपोतल्या  प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचं सांगण्यात आलं. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग नियंत्रणात आणली. या आगीमध्ये प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान झालंय.  ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती होऊन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल, अशी माहितीसुद्धा देण्यात आली. मात्र प्रश्न असा आहे, की अहिल्यानगर महापालिकेचा कचरा डेपो आणखी किती वेळा जळणार आहे? या कचराडेपोला आग लागली की लावण्यात आली? आयुक्त यशवंत डांगे, सखोल आणि नि:पक्षपातीपणे चौकशी कराल का?

बुरुडगाव कचराडेपोमध्ये असलेल्या एका डीपीजवळ शॉर्टसर्किट झालं. तेथून प्रकल्पापर्यंत जाणारी विद्युत वाहिनी जळाल्याने प्रकल्पाच्या पॅनलमध्ये आग लागली, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.  योगायोग म्हणजे यापूर्वीदेखील बुरुडगावच्या कचरा डेपोला आग लागली होती. अनेक दिवस हा कचरा डेपो आग आणि धुरामध्ये धुमसत होता. सध्याचे आयुक्त डांगे हे त्यावेळी उपायुक्त होते. त्यावेळीदेखील या कचरा डेपोच्या आगीची चौकशी करण्यात आली नाही. त्यावेळी आणि आता लागलेल्या आगीत किती टन कचरा जळाला? आग लागण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने किती टन कचऱ्यावर प्रक्रिया केली? यातून अहिल्यानगर महापालिकेचा नक्की किती रुपयांचा आर्थिक फायदा झाला? या प्रश्नांची उत्तरं आयुक्त आणि प्रशासक असलेल्या यशवंत डांगे यांनी नगरकरांना देण्याची आवश्यकता आहे.

या आगीत प्रकल्पातल्या मशीनच्या काही पार्टचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याची दुरुस्ती केली जाणार असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केले जाईल, असंही सांगितलं जातंय. परंतू आतापर्यंत या ठिकाणी किती टन कचरा जमा झाला होता, त्या कचऱ्यावर संबंधित ठेकेदारानं कशा प्रकारची प्रक्रिया केली होती, या प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगर महापालिकेला किती आर्थिक लाभ झाला, याचा ताळेबंद आयुक्त डांगे नगरकरांसमोर कधी सादर करणार आहेत? 

…बुरुडगावकरांच्या आरोग्याचं काय?

बुरुडगावच्या कचराडेपोला यापूर्वीही आग लागली होती. त्यावेळीदेखील बुरुडगावच्या ग्रामस्थांचे डोळे चुरचुरले होते. अनेकांना श्वसनाचा त्रास झाला होता. अनेक लहान बालकांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. त्यामुळेच या कचराडेपोला बुरुडगावच्या ग्रामस्थांनी त्यावेळी विरोध केला होता. या कचराडेपोला लागलेल्या आग आणि धुरामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, त्याची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणारच नाही का? बुडगावकरांच्या आरोग्याचं काय, याचा विचार नक्की कधी होणार, हादेखील मोठा प्रश्न आहे.

नगरकरांनो, आगीच्या नुसत्या बातम्या वाचणार आहात का? प्रशासनाला जाब कधी विचारताय?

 बुरुडगावच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची छायाचित्रं आणि बातमी ‘पद्धतशीरपणे’ सोशल मिडियासह विविध वर्तमानपत्रांना पोहोचविण्यात आली. आज आणि उद्या ही बातमी नगरकर मोठ्या कुतुहलानं वाचतील. पण नगरकरांना आमचा एक प्रश्न आहे, नगरकरांनो, या आगीच्या नुसत्या बातम्या वाचणार आहात का? या आगीला जबाबदार असलेल्या ठेकेदाराविरुद्ध नक्की काय कारवाई केली जाणार, यामध्ये तुमच्या हक्काच्या महापालिकेचं किती रुपयांचं आर्थिक नुकसान झालं, याचा  प्रशासनाला जाब कधी विचारताय?

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी