Thursday, January 23, 2025

आढाव वकील दांपत्याच्या खून प्रकरणाच्या सुनावणीला अहिल्यानगरच्या कोर्टात झाली सुरुवात ; माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे यानं दिली गुन्ह्याची कबुली…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर 

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात असलेल्या मानोरी इथं राहणाऱ्या ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची मागच्या वर्षी 24 जानेवारी दरम्यान निर्गुण हत्या करण्यात आली होती. मित्राचा जामीन करण्यासाठी पाथर्डी कोर्टात जायचंय,  असं सांगून या दोघांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर या दोघांचा निर्गुण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातला माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अहिल्यानगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. 

सरकार पक्षाकडून ॲडव्होकेट उज्वल निकम यांनी बाजू मांडली. माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने या खून खटल्याचा न्यायालयासमोर घटनाक्रम सांगितला. 24 जानेवारी रोजी हॉटेल रॉयल पॅलेस येथे किरण दुशिंग, बबन मोरे भैय्या खांदे शुभम महाडिक यांनी एका वकिलाला उचलायचे आणि त्याच्याकडून दहा लाख रुपये घ्यायचे. नाही दिले तर त्याचा गेम करायचा असा कट रचला. मला पैशांची गरज असल्यामुळे मी त्या गटात सहभागी झाल्याचं हर्षल ढोकणे यानं सांगितलं. घटनाक्रम सांगत असताना हर्षल ढोकणे याने ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचे हात बांधलेला गमच्छा ओळखला. 

आढाव दांप्त्याच्या या सत्तेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. घटनाक्रम सांगत असताना माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याला चक्कर आल्याने या खटल्याची सुनावणी स्थगित करण्यात आली तसेच सरकारी रुग्णालय त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आलं. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी