Thursday, May 8, 2025

… आणि भारत-पाक सीमेवर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु…! ‘बॉर्डर’वर जाऊन परिस्थितीचा आढावा घ्या…! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आदेश…!

लोकपत डिजिटल मीडिया / नवीदिल्ली / वृत्तसंस्था 

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना सीमेवर (Border) जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिल्याचंही वृत्त आहे. भारताच्या (India) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) म्होरक्या मसूद अझहरच्या (Masood Azhar) कुटुंबातील १० सदस्य आणि ४ जवळचे साथीदार, असे एकूण १४ जण मारले गेल्याची माहिती मसूद अझहरने (Masood Azhar) स्वतः एक निवेदन जारी करून दिली होती. नियंत्रण रेषेवर (LoC) दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असल्याचीही माहिती आहे.

पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवाद्यांवर भारताने (India) केलेल्या या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नॉर्वे (Norway), क्रोएशिया (Croatia) आणि नेदरलँड्स (Netherlands) या तीन युरोपीय देशांचा आगामी दौरा सध्यासाठी रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय चर्चा आणि बैठका नियोजित होत्या. दौरा रद्द करण्याचे अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.

मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र दलांनी (Indian Armed Forces) पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) ९ दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले (Missile Strikes) केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. पहलगाम (Pahalgam) हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देण्याचा इशारा दिला होता.

या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव खुद्द पंतप्रधान मोदींनी (PM Modi) दिल्याची माहिती आहे. भारतीय लष्कर (Indian Army), नौदल (Indian Navy) आणि हवाई दलाच्या (Indian Air Force) अचूक मारा करणाऱ्या शस्त्र प्रणालींचा वापर या ऑपरेशनमध्ये करण्यात आला. पंतप्रधान मोदी (PM Modi) स्वतः या ऑपरेशनवर सतत लक्ष ठेवून होते आणि सर्व ९ लक्ष्ये यशस्वीरित्या भेदण्यात आली.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी