लोकपत डिजिटल मीडिया / नवीदिल्ली
जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून ते नवीदिल्लीला परतले आहेत. या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली आहे आणि ते तातडीने सुरक्षा आढावा घेण्यासाठी पहलगामला गेले आहेत. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याला “घृणास्पद” असे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि असे म्हटलं आहे, की अशा कृत्यांचा निषेध केला पाहिजे. दरम्यान, असल्या भ्याड हल्ल्यांसंदर्भात तमाम देशवासियांचं एकच म्हणणं आहे, की आता बस करा, पाकड्यांना आणि त्यांच्या ‘लष्कर ए तैयबा’ला गाडून टाका’.
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या गटावर काल दि. २२) गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. त्याने हातात बंदूक धरलेली दिसत आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजता ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन टेकडी भागात झालेल्या हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. गोळीबार सुरु होताच पर्यटक मोकळ्या गवताळ प्रदेशात आश्रय घेण्यासाठी पळत होते. लपण्यासाठी जागा नव्हती, असं सांगत एका प्रत्यक्षदर्शीनं पर्यटकांच्या पळून जाण्याच्या प्रयत्नांची आठवण करून दिली. घटनास्थळावरील कुरणात मृतदेह विखुरलेले दिसत होते तर स्थानिक लोक मदत देण्यासाठी धावत करत होते. महिला भगिनी ओक्साबोक्सी रडत होत्या.
अनेक वरिष्ठ नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे, पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल दुःख आणि सहानूभूती व्यक्त केली आहे. गुन्हेगारांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी या प्रदेशात शोध मोहीम तीव्र केली आहे. निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रीय शोक व्यक्त करत असताना सुरक्षा दलांनी शोध मोहिमा सुरू ठेवल्या आहेत. अधिकाऱ्यांनी मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा आणि जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी आणि पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुन्हा एकदा 26 /11 अटॅकची वाट पाहताय का?
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या लष्कर ए तैयबा’ या दहशतवादी संघटनेनं जशी घेतली, तशीच यापूर्वी 2011 मध्ये 26 तारखेला मुंबईतल्या ताज हॉटेल्स अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या गोळीबारात शेकडो निरपराध माणसं मारली गेली होती. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारीसुद्धा पाकिस्तानच्या ‘लष्कर ए तैयबा’ या संघटनेने घेतली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री गप्प का आहेत? पुन्हा एकदा 26 11 ची वाट पाहताहेत का, असा सवाल देशातली संतप्त जनता करत आहे.