लोकपत न्यूज नेटवर्क / नाशिक
राज्याच्या विधानसभेचे 288 आमदार, विधानपरिषदेचे 78 आमदार आणि लोकसभेचे 545 खासदार या सर्वांनी गुंडागर्दीचा आश्रय घेत सत्ता काबीज केल्याचा खळबळजनक आरोप नाशिकच्या महाराष्ट्र निर्भय पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे
यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केलाय. राज्यातल्या आमदार – खासदारांना उद्देशून भावे म्हणाले, ‘संविधानानं ज्या पद्धतीनं निवडणूक लढवायला लावली, त्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढवत नाहीत. अगदी ग्रामपंचायतीपासून विधानसभा लोकसभेपर्यंत गुंडांचा आश्रय घेत तुम्ही सत्तेची खुर्ची मिळवता. राजकारण आणि निवडणुकांची तुम्ही सर्वांनी वाट लावली आहे. गुन्हेगारांबद्दल समाजात प्रचंड संताप असताना वाल्मीक कराड सायबर विभागाच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आदेश देतो, की हे डिलीट कर, ते डिलीट कर. असे छोटे मोठे ‘आका’ प्रत्येक पोलीस ठाण्यात आहेत. जितेंद्र भावे नक्की काय म्हणताहेत, हे आता तुम्ही नक्कीच पहा आणि ऐका.
आम्ही खाली दिलेली ही फेसबुकची लिंक बराच वेळ दाबून ठेवा. त्यानंतर इंग्रजीतून open असा शब्द येईल. ती लिंक ओपन करा. त्यानंतर निर्भय पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे काय म्हणताहेत, हे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद .
https://www.facebook.com/share/v/1XZKtx5uKA/