बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
संपूर्ण राज्यभरात विधानसभेचे निकाल धक्कादायक लागले. नेवासे तालुक्यातसुद्धा अनपेक्षित असा निकाल लागला. मात्र आमदार विठ्ठलराव लंघे
यांच्या या विजयाचे खरेखुरे शिल्पकार, ‘त्यागमूर्ती’ पंचगंगा सीड्स आणि पंचगंगा साखर उद्योग समुहाचे संस्थापक प्रभाकर काका शिंदे
हेच ठरले आहेत. यासाठी प्रभाकर काका शिंदे यांना माजी खासदार स्वर्गीय तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख (पेशवे), भारतीय जनता पक्षाचे खमक्या स्वभावाचे आणि ‘नो सेटलमेंट’ ओन्ली डेव्हलपमेंट’ या घोषवाक्यानुसार वाटचाल करणारे सचिन देसरडा,
नितीन शिरसाठ, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील,
डॉ. बाळासाहेब कोलते, ज्ञानेश्वर माऊली पेचे, प्रताप काका चिंधे यांच्यासह अनेकांची खंबीर साथ मिळाली. या सर्वांनी खरं तर ही विजयश्री खेचून आणलीय.
आपल्याकडे एक असं सुसंस्कृत वातावरण नेहमी पहायला मिळतं, की जर कोणी पाहुणा घरी आला तर त्याला जेवायला वाढलं जातं. आणि बसायला पाट दिला जातो. पण त्या पाहुण्याला जेवणासाठी दिला जाणारा जो पाट असतो, तो एखाद्या पाहुण्याला कायमस्वरुपी कोणीही देत नाही. मात्र प्रभाकर काका शिंदे यांनी जेवणाच्या ताटासह पाटदेखील देऊन टाकलाय.
दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर स्वतःला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विधानसभेची उमेदवारी मिळत असतानादेखील स्वइच्छेला मुरड घालत भाजपच्या विठ्ठलराव लंघे यांना ती उमेदवारी दिली आणि स्वतः उमेदवार असल्याच्या भावनेतून प्रभाकर काका शिंदे यांनी त्यांच्या इमानी सहकाऱ्यांसमवेत अंत:करणातून
प्रामाणिकपणे काम करत विठ्ठलराव लंघे यांना या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
या निवडणुकीत प्रभाकर काका शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून भाजपचे खंदे समर्थक सचिन देसरडा यांनी मोलाची अशी खंबीर साथ दिली. नितीन शिरसाठ यांच्यामुळे दलित समाज बांधवांची मतं विठ्ठलराव लंघे यांच्या पारड्यात पडली. ऋषिकेश शेटे पाटील यांनी संपूर्ण नेवासे तालुक्यात हजारो तरुणांची जी मोट बांधली होती, त्या सर्व तरुणांच्या आधारावर तालुक्यातील सर्वच गावं ऋषिकेश शेटे पाटील यांनी पिंजून काढली.
कोणाला अर्ध्या रात्री काही अडचण आली तर क्षणाचाही विलंब न करता ऋषिकेश शेटे पाटील हे संबंधितांच्या मदतीला होऊन जात असतात. यातूनच त्यांची तरुणांपासून वयोवृद्ध मतदारांमध्ये मोठी ‘क्रेझ’ निर्माण झाली. या सगळ्यांचा विठ्ठलराव लंघे यांच्या विधानसभा निवडणुकीतल्या या विजयासाठी मोठा हातभार लागला.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा असाही दिलदारपणा…!
निवडणुकीत कोणाचा तरी एकाचा विजय होत असतो आणि कोणाचा तरी एकाचा पराभव होत असतो. मात्र झालेला पराभव मोकळ्या मनानं आणि खिलाडू वृत्तीनं स्विकारायलासुद्धा फार मोठं मन लागतं, समजूतदारपणा लागतो. माजी मंत्री शंकरराव गडाख
यांनी ते मोठं मन दाखवलं, समजूतदारपणा दाखवला आणि विठ्ठलराव लंघे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. माजी आमदार शंकरराव गडाख यांचा हा दिलदारपणा तालुक्यातल्या सर्वांनाच भावलाय. यापुढेही रचनात्मक कार्यातून तालुक्याच्या विकास कामांना गती देणार असल्याचं त्यांनी बोलूनही दाखवलंय.
‘देवगावकरां’चा हट्ट त्यांनाच नडला…!
या निवडणुकीत सुरुवातीला अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा ज्यांनी केली आणि अंतिम टप्प्यात प्रहार जन पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी केली, ते ‘देवगावकर’ थांबतील, असा अनेकांना अंदाज होता. मात्र त्यांनी न थांबता ही निवडणूक केली आणि 35 हजार मतं स्वतःच्या पदरात पाडून घेतली. मात्र या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांचा हा हट्ट त्यांनाच नडला, हे मात्र सूर्यप्रकाशाइतकंच प्रखर सत्य आहे.