लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नगरमध्ये सुरु असलेला आरटीओचा भोंगळा कारभार हा इतका गैरव्यवहाराच्या शिखरावर गेलाय, की हे सारं पाहूनही आपण जीवंत कसे, असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडलाय. आरटीओचा हा कारभार या जन्मात तरी सुधारणार का, हाच मोठा प्रश्न आहे. या शहरात तीन चाकी वाहनं, ज्यांची कायदेशीर व्हॅलिडीटी संपली आहे, तिथंपासून ते १८ टायर्सचं एकही वाहन ‘दुधाच्या रतीबा’शिवाय तीन दिवसही चालत नाही.
प्रत्येक पोलीस स्टेशन आणि प्रत्येक आर टी ओ ऑफिसचं ‘कलेक्शन’ करणारे असतात. एक दिवस पण उशिर चालत नाही. अमूक तारखेपर्यंत आलेलं ‘कलेक्शन’ त्या वाहनाचा नंबर लिस्टमध्ये समाविष्ट होतो. ही लिस्ट प्रत्येक आर टी ओ कड़े असते. आर टी ओ हे वाहन पकडूच शकत नाही.
नवीन टु व्हीलर शोरूममधून आर टी ओ पासिंग करुन ताब्यात मिळते. ३० वर्षांपूर्वी एका टु व्हीलरला ५/- रुपये दर होता. हा ‘रतीबा’चा धंदा अतिशय मोठा असून विश्वासार्हता खूप मोठी असते. मध्यरात्री २.०० वाजता मामूली एजंट मोठ्या आवाजात आर टी ओ साहबांना सांगतो, ‘साहेब, ‘लिस्टा’तली म्हणजे ‘कलेक्शन’च्या यादीतली गाड़ी आहे. गाड़ी सोडून द्या. ‘लिस्ट’ बघा ज़रा’.
मध्यरात्री कॉन्स्टेबल पण हेच सांगतो, डी वायएस पी साहेंबांना. हा रतीब धंदा मुंबईतल्या डबेवाल्याच्या खालोखाल चाकोरीबध्द आहे. एकदम सुक्ष्म (मायक्रो) पध्दतीचं हे नियोजन असतं. ‘डिजिटल पेपरलेस यंत्रणा’, ‘ओन्ली नोट अँन्ड नोटींग’ असा हा कारभार दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांकडे जरी दिला तरी यात बदल होणार नाही, जळजळीत वास्तव आहे.