लोकमत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
मुंबईच्या कुर्ला उपनगरात काल ( दि. ९) रात्री बेस्ट बसने अनेकांना चिरडलं. या भीषण अपघातात ७ जण ठार तर ४८ जण जखमी झाले आहेत. यामध्ये काहींचा तात्काळ मृत्यू झाला तर काहींचा उपचारादरम्या मृत्यू झाला. या अपघाताची कारण आता समोर येत आहेत. ज्याच्यामुळे हा अपघात झाला त्या संजय मोरेला इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा अनुभव नव्हता मात्र तरीही त्याला दहा दिवसांचा अल्पकाळातलं प्रशिक्षण देण्यात आलं हे प्रशिक्षण देणाऱ्यांना पोलीस आता सह आरोपी करतील का हाच खरा प्रश्न आहे.
संजय मोरे हा कोरोना काळापासून बेस्ट मध्ये कंत्राटी कामावर होता. लहान आकाराच्या जुन्या बस तो चालवायचा. मात्र अलीकडेच त्याला इलेक्ट्रिक वाहन चालवायला देण्यात आलं होतं. या बस मध्ये पॉवर स्टेरिंग होतं. पॉवर स्टेरिंगचा अनुभव नसल्यामुळे हा अपघात झाल्याच समोर येत आहे. संजय मोरे यांच्याकडे अवजड वाहन चालवायचा परवाना आहे. मात्र त्याला मोठी बस चालवायचा अनुभव नव्हता असं पोलीस तपासात पुढे आला आहे.
संजय मोरेला काल काल म्हणजे सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी मोरे यांनी मध्यप्रदेश केले होते की नाही याची चाचणी करण्यात आली. मात्र त्यानं मद्यप्राशन केलं नसल्याचं यावेळी पुढे आलं. दरम्यान संजय मोरे याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नसताना देखील त्याला ती बस चालवायला कशी दिली, याचाही तपास सुरु आहे.