लोकपत न्यूज नेटवर्क / वैजापूर / प्रतिनिधी
पंचगंगा उद्योग समुहाच्या बहुचर्चित पंचगंगा शुगर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या गणित हंगामाचा भव्य असा शुभारंभ काल (दि. २३) संत महंतांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला. नेवासे तालुक्याचं भूषण असलेले देवगड संस्थांचे प्रमुख मार्गदर्शक वंदनीय भास्करगिरी महाराज, गोदाधमचे महंत रामगिरी महाराज यांच्यासह दिग्गज राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोहळ्यात या कारखान्याचे चेअरमन प्रभाकर काका शिंदे यांनी प्रास्तविक करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे.
ऊस उत्पादक शेतकरी बांधव त्यांच्या उसाचं वजन कुठल्याही काट्यावर करू शकतात. मात्र ते वजन आणि पंचगंगा कारखान्यात केलेल्या वजन यात एक किलोचादेखील फरक दिसणार नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर उसाचा काटा मारणार नाही, अशी स्पष्ट ग्वाहीच चेअरमन प्रभाकर शदे यांनी यावेळी बोलताना दिली. मात्र त्यांची ही ग्वाही नक्की कोणत्या साखर सम्राटाला चिमटा काढणारी आहे, अशी चर्चा या निमित्तानं ऐकायला मिळत आहे.
याप्रसंगी देवगड संस्थानचे अध्यक्ष भास्करगिरी महाराज, गोदाधामसे महंत रामगिरी महाराज, देवगडचे उत्तराधिकारी हभप प्रकाशानंद गिरी महाराज, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, किसनराव गडाख (पेशवे), निवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात नक्की कोण काय काय म्हणालं, हे या बातमीत दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून नक्की जाणून घ्या.