लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
जिल्हा पोलीस पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातल्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नमूद आदेशान्वये अहिल्यानगर एलसीबीच्या पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत नेवासे तालुक्यातल्या घोडेगाव इथं काही इसमानी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ४२ जनावरांची सुटका केली. या कारवाईमुळे मुक्या जनावरांना जीवनदान मिळालं.
जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातले पोलीस सबइन्स्पेक्टर अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, संतोष लोढे, बिरप्पा करमल, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, रविंद्र घुंगासे, उमाकांत गावडे यांचं पथक तयार करुन सोनई पोलीस स्टेशन हद्दीतल्या अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 17/06/2025 रोजी या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे फिरोज रशीद शेख (रा. कृष्णानगर, घोडेगाव, ता. नेवासा) व आणि पापा कुरेशी (रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी मिळून फिरोज रशीद शेख याच्या राहत्या घराजवळ घोडेगाव इथं गोवंश जातीची जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशाने निदर्यतेने डांबून ठेवली आहेत. या पथकाने मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला.
दर घटनेच्या ठिकाणी काही इसम दोन ट्रकमध्ये गोवंश जीवंत जनावरे भरताना दिसून आले. एका टेम्पोमध्ये जनावरे भरलेले असताना मिळून आले. या पथकाने घटना ठिकाणावरून 1) निलेश रामकृष्ण शिंदे (वय 35, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), 2) शाहरूख शमशुद्दीन शेख (वय 25, रा. जुनी पेठ, घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), 3) भारत भाऊसाहेब शहाराव (वय 36, रा. फत्तेपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अशांना ताब्यात घेतलं.
पथकाने पंचासमक्ष घटना ठिकाणावरून 27,00,000/- रू किं. त्यात अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच-23-एयु-5523, 15,00,000/- रू किं.त्यात टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच-16-सीडी-4877, 30,00,000/- रू किं.त्यात टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच-16-एई-5484, 5,00,000/- रू किं.मारूती सुझुकी कंपनीची वॅगनर कार क्रमांक एमएच-05-बीएस-2898, 3,00,000/- रू किं.त्यात मारूती सुझुकी अल्टो कार क्रमांक एमएच-14-ईयु-1937, 22,90,000/- रू किं.त्यात 42 गोवंशीय लहान मोठी जनावरे असा एकूण 1,02,90,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यातल्या आरोपींकडे घटना ठिकाणच्या गोवंश जनावरांबाबत विचारपूस केली असता सदरची जनावरे फिरोज रशीद शेख (रा. कृष्णानगर, घोडेगाव, ता. नेवासा) (फरार), पापा कुरेशी (रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) (पूर्ण नाव माहित नाही) (फरार) यांच्या मालकीची असून त्यांच्या सांगण्यावरून नमूद जनावरे ही कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगितली. ताब्यातील आरोपी मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आली आहेत.
पथकाने वर नमूद आरोपींविरूध्द सोनई पोलीस ठाणे गु. र. नं. 230 / 2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.