लोकपत न्यूज नेटवर्क / अकोले
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात महाराष्ट्रातल्या सर्वात उंच कळसुबाई हे प्रसिद्ध शिखर आहे. पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी हे शिखर ऊर्जा स्थान आहे. दरवर्षी अनेक पर्यटक आणि गिर्यारोहक पायी चालत चालत येऊन या शिखराला भेट देत आहेत.
परंतु ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी या कळसुबाई शिखरावर तब्बल 250 कोटी रुपये खर्च करून रोपवे तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलीय.
दरम्यान, कळसुबाई शिखरावर रोपवे झाल्यानंतर पर्यटनामध्ये वाढ होणार आहे. ही शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. परंतु नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या रस्त्याने या शिखराचा अंतर कमी होत जातं.
घोटी – भंडारदरा रस्त्यालगतच्या बाकी गावापासून कळसुबाई शिखराकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे. या शिखरावर रोपवे बसविण्याच्या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.