लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
मित्रांनो आजपासून (दि. 1) 2025 हे नवीन वर्ष सुरू झालं आहे. आता या नव्या वर्षात सोन्याचे दर कसे राहतील याविषयी तुम्हाला उत्सुकता असणारच विशेषतः महिला वर्गांमध्ये याविषयी जास्तीत जास्त उत्सुकता असते त्यामुळे आम्ही तुम्हाला 2025 मध्ये सोन्याचे दर कसे असणार आहेत याविषयी या बातमीच्या माध्यमातून माहिती देत आहोत ती बातमी तुम्ही सविस्तरपणे वाचा आणि 2025 मध्ये असणारे सोन्याचे भाव जाणून घ्या.
सोन्याच्या दरांमध्ये नव्या वर्षात तेजी पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 4 हजार 400 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7 लाख 75 हजार 600 रुपयांवरून 7 लाख 80 लाख रुपये इतका झाला आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली आहे.
राज्यातल्या विविध शहरांमध्ये सोन्याचे आजचे (दिनांक 1 जानेवारी 2025) आणि कालचे म्हणजे 2024 सालातले दर काय होते, हे आता जाणून घ्या. कंसात सोन्याचे आजचे भाव दिले आहेत आणि कंसाबाहेर कालचे भाव दिले आहेत. मुंबई 78, 000 (77, 000), पुणे 78, 000 (77000), नागपूर 78, 000 (77 000), कोल्हापूर 78, 000 (77, 000), जळगाव 78, 000 (77, 000), सांगली 78, 000 (77, 000) आणि बारामती 78, 000 (77, 000).