लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक औषधी फळांची झाडं असतात. मात्र त्या फळांचा मानवी आरोग्यासाठी कितपत उपयोग होतो याची माहिती आपल्याला नसते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही एका अशा फळाविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत की जी फळ खाल्ल्याने डायबेटीस अर्थात मधुमेह हा आजार बरा होण्याला चांगल्यापैकी मदत मिळते.
मित्रांनो, हे फळ आहे अंजीर. अंजीर या झाडाची उंची 800 ते 22 मीटर असते. वीस ते पंचवीस सेंटीमीटर या झाडाच्या पानाचा आकार असतो. या फळात औषधी गुणधर्म आहेत. आंबा आणि सफरचंद या फळांच्या तुलनेत अंजीर या फळांमध्ये चरबी प्रथिने फायबर खनिजे जास्त असतात.
अंजीर या फळामध्ये 83% साखर असते त्यामुळे ती जगातील सर्वात गोड फळ बनते. मात्र तरी देखील अंजीर हे फळ खाल्ल्याने डायबिटीस अर्थात मधुमेह असलेल्या रुग्णांना त्याचा फायदा मिळतो. अंजीर हे फळ पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. यामुळे मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
अंजीर मध्ये जिवाणू नाशक गुणधर्म असलेले फिनोलिक गुणधर्म असतात. यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातले विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी ही फळ अवश्य खायला हवं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.