Monday, June 16, 2025

कॅन्टोन्मेंट बोर्ड सीईओ मोरे साहेब! भिंगारमधल्या टपऱ्यांचं ‘ऑडिट’ कराल का? भिंगारमध्ये नक्की किती टपऱ्या आहेत? किती महसूल गोळा होतोय?

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर 

अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार या पौराणिक वारसा असलेल्या शहरातून कल्याण – विशाखापट्टणम महामार्ग जात आहे. पाथर्डी, शेवगावकडेदेखील याच महामार्गाने ये – जा केली जाते. त्यामुळे या महामार्गावर विशेषता भिंगार शहर आणि परिसरात अवजड वाहनांसह अनेक प्रकारच्या वाहनांची रात्रं दिवस मोठी वर्दळ असते.

हे कमी म्हणून की काय, भिंगार शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी टपऱ्या किंवा छोटे स्टॉल टाकण्यात आले आहेत. मात्र या सर्व  टपऱ्यांचं ‘ऑडिट’ कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने कधी केलं आहे का, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर असा सवाल आम्ही उपस्थित करू इच्छितो, की  कॅन्टोन्मेंट बोर्ड सीईओ मोरे साहेब, भिंगारमधल्या टपऱ्यांचं ‘ऑडिट’ कराल का? भिंगारमध्ये आजमितीला  नक्की किती टपऱ्या आहेत? या टपऱ्यांच्या माध्यमातून किती महसूल गोळा होतोय? यामध्ये किती रुपयांचा गफला केला जातो? या प्रश्नांची उत्तरं भिंगारकरांना मिळण्गयाचीच खरं तर गरज आहे. 

प्रयागराजला गंगास्नान तर भिंगारला गटारगंगा स्नान…! स्वच्छता निरीक्षक भोर साहेब! जागे आहात की …?

भिंगार वेशीत आज (दि. ७) सकाळपासून गटाराचं पाणी वाहत आहे. या भागातली गटार तुंबल्यानं ही समस्या उद्भवली होती. या दुरुस्तीचं काम सुरु असलं तरी भिंगार वेशीत वाहत जाणारी ही गटारगंगा अनेक वाहन चालकांच्या संतापाचा विषय बनली. या रस्त्यावरुन पाथर्डी, शेवगाव आणि थेट कल्याण – विशाखापट्टणम अशी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना या गटारगंगेचं दर्शन घेता आलं. भिंगार वेशीतून पायी अथवा दुचाकीवरुन जाणाऱ्यांना या गटारगंगेचा मनसोक्त स्नान घडत होतं. केंद्र आणि स्थानिक उत्तर प्रदेश सरकार एकीकडे, देशातल्या भाविकांना प्रयागराज इथं गंगास्नान घडवित आहे. मात्र नगर कॅन्टोन्मेंट बोर्ड नागरिकांना गटारी जनतेचे स्नान घडवीत आहे, हे मोठं दुर्दैवी आहे. हे सर पाहण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहेत, त्यांना आमचा सवाल आहे, की प्रयागराजला गंगास्नान तर भिंगारला गटारगंगा स्नान…! स्वच्छता निरीक्षक भोर साहेब! आपण जागे आहात की …?

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी