Thursday, January 23, 2025

‘कॅफे शॉप’मधून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला प्रोत्साहन…! एसपी आणि सिटी डी. वाय. एस. पी. साहेब, सर्वांचीच कानउघडणी करा…!

संपादकीय…!

त्याग, तपश्चर्या आणि शौर्याची खरं तर आपली महाराष्ट्र भूमी आहे. वेगवेगळ्या संत महंतांसह युगपुरुषाचा पावन पदस्पर्श या भूमीला लाभला आहे. स्वतंत्र भारत देशाबद्दलसुद्धा हेच सांगितलं जातं. किंबहूना तसं वास्तवदेखील आहे. महाराष्ट्रात अहिल्यानगर ही शहर आहे आणि या शहरात ठिकठिकाणी असलेल्या ‘कॅफे शॉप’मधून शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना ‘कॅफे शॉप’मधून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’साठी प्रोत्साहन दिलं जातंय. पहिल्यांदा घरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या सहकार्याने ज्यावेळी एका ‘कॅफे शॉप’वर छापा टाकला, त्यावेळी हा घाणेरडा प्रकार समोर आला. अहिल्यानगर जिल्ह्याचे एस.पी. राकेश ओला,

शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक (City dysp) अमोल भारती यांनी खरं तर शहर आणि परिसरातील सर्वच कॅफे शॉप चालक आणि तिथे जाणाऱ्या मुला-मुलींची चांगलीच कानउघडणी करण्याची आवश्यकता आहे.

पाश्चात्य देशाप्रमाणे आपल्या देशात अजून तरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर
मान्यता देण्यात आलेली नाही. या उलट आपल्या देशात तरुणांनी लग्नपूर्वी ब्रह्मचर्य व्रताचे कठोरपणे पालन करण्याचं संत महंतांकडून सांगितलं जातात. खरंतर सर्वस्वाचा हा त्याग प्रत्येक तरुणाने लग्नापूर्वी करावा, अशी समाजातल्या थोडा मोठ्यांची अपेक्षा असते.

दुर्दैवानं पाश्चात्त्य देशातल्या घाणेरड्या संस्कृतीचं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अनुकरण केलं जात आहे. ‘कॅफे शॉप’ हा त्यातला घाणेरडा प्रकार आहे. या ‘कॅफे शॉप’मध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मुला मुलींनी देशाच्या विकासासाठी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. मात्र हेच तरुण-तरुणी जर अश्लिलतेकडे जाणार असतील तर या देशाचं भवितव्य निश्चितपणे अंध:कारमय आहे.

मोठमोठ्या शहरात आजही तरुण-तरुणी
‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याच्या घाणेरड्या पद्धतीला ‘मॉडर्न’ समजू लागले आहेत. विशेष म्हणजे याविषयी पालकांना आणि शिक्षकांना कुठलीच कल्पना नसते. कारण शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असलेले तरुण-तरुणी बाहेर कोणकोणते गुण उधळताहेत, याविषयी सर्वच अनभिज्ञ असतात.

एक तर या तरुण-तरुणींचा स्वतःचा स्वतःवर धाक असला पाहिजे. कारण या वयात पालक त्यांना कायद्याने धाक लावू शकत नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी पोलिसांनावरच येते. म्हणून अहिल्यानगरच्या पोलिसांनी कोतवाली तोफखाना भिंगार एमआयडीसी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या ‘कॅफे शॉप’ आणि अन्य वाईट गोष्टींवर करडी नजर ठेवत ‘वाकडं पाऊल’ पडणाऱ्या आणि लग्नापूर्वीच अश्लिलतेच्या
विश्वात घेऊन जाणाऱ्या या ‘कॅफे शॉप’च्या चालकांना प्लास्टिकच्या काठीने झोडपून काढण्याची खरी आवश्यकता आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी