लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली
मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पानंतर अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या असून काही वस्तूंच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. तर अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या महाग झाल्या, हे आता या बातमीतून तुम्ही जाणून घ्या.
केंद्र सरकारने मानवी जीवन वाचवणाऱ्या 36 जीवरक्षक औषधावरून कस्टम ड्युटी हटवली आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनावरील पाच टक्के शुल्क कमी केलं आहे. एचडी आणि एलईडी टीव्ही तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ओपन सेलवरील कस्टम ड्युटी केंद्र सरकारने काढून टाकली आहे. त्यामुळे या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
स्मार्ट मीटर सोलर सेल, इम्पोर्टेड शूज, इम्पोर्टेड मेणबत्त्या, इम्पोर्टेड जहाजे, पीव्हीसी फ्लेक्स फिल्म, पीव्हीसी फ्लेक्स बॅनर, विणकाम, फॅब्रिक हे महाग झालं आहे. वस्तूंच्या किमती अर्थसंकल्पात कशा वाढतात आणि कशा कमी होतात हे आता जाणून घ्या. अर्थसंकल्पात कोणतेही उत्पादन थेट स्वस्त आणि महाग नसते. कस्टम ड्युटी आणि एक्साईज ड्युटी यासारख्या अप्रत्यक्ष करांमध्ये वाढ आणि घड झाली तर वस्तू महाग आणि स्वस्त होतात.