लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी (दि. १२) दुपारी शनिशिंगणापूरला (ता. नेवासा) येत असून दुपारी ३.५० ते ४.१५ या वेळेत शहा शनिदेवाचं
दर्शन घेणार आहेत. रविवारी (दि. १२) शिर्डी इथं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री शहा
आणि भाजपचे अन्य पदाधिकारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
केंद्रीय मंत्री शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिशिंगणापूर इथं नुकतीच भेट देऊन सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या. केंद्रीय मंत्री शहा हे पहिल्यांदाच शनिशिंगणापूरला येत आहेत. शनिदेव हे नवग्रहांपैकी जागृत देवता आहे. शनिदेवाच्या अवकृपेमुळे साडेसातीच्या काळात किती मानसिक त्रास होतो, हे साडेसातीतून गेलेल्यांना चांगल्यापैकी माहित आहे. मात्र शनिदेवाची मनोभावे भक्ती केल्यास ते या साडेसातीतून मनुष्याला मुक्तदेखील करतात, अशी आख्यायिका आहे.
शनिदेवाला काय मागणार केंद्रीय मंत्री अमित शहा?
देशाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच शनिशिंगणापूरला येत आहेत. शनिदेवाच्या महतीबद्दल त्यांना पूर्ण कल्पना आहे. देशाच्या राजकारणाचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय मंत्री शहा
हे शनिदेवाकडे नक्की काय मागतात, शनिदेवाला कोणती प्रार्थना करतात, याकडे मात्र अनेकांचे लक्ष लागलं आहे.