लोकपत न्यूज नेटवर्क / पुणे
खडकी (पुणे) येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक महादेव रोकडे यांची खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्यपदी मराठी विभागप्रमुख नियुक्ती झाली.
प्राध्यापक महादेव रोकडे हे गेली 32 वर्षे खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत ते मूळचे पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावचे असून सोमेश्वर नगर येथील मु.सा काकडे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत प्रा.रोकडे हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून सुपरीचित असून, ते कवी, लेखक, प्रेरणादायी वक्ते, व मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
प्रा. रोकडे यांनी अध्यापनामध्ये अनेकविध उपक्रम राबवले आहेत. तसेच तीस वर्षापासून ते प्रत्येक वर्षी एका गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन सर्व शिक्षण पूर्ण करतात. ‘नोकरी माझी भाकरी आणि विद्यार्थी’ हेच माझे दैवत ‘ या एकमेव ध्येयाने ते अध्यापन करीत आहेत.त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी आजपर्यंत 32 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गेल्या 30 वर्षापासून आदिवासी समाजासाठी कार्यरत असलेल्या प्रा. रोकडे यांना दिल्ली येथील हुमान राइट्स ऑर्गनायझेशन भारत सरकार सलग्न या संस्थेकडून ‘सोशल वर्क’मध्ये मानद डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर विविध विषयावर 840 व्याख्याने दिलेली आहेत.
माणसाच्या आयुष्यात कल्पकता, सर्जनशीलता, नाविन्यता आणि उत्साह असेल तर वाट्याला आलेली प्रतिकूलता फोडून यशाला कवेत घेता येते, प्रयत्नाच्या
पराकष्टाने यशाचा हा प्रामाणिक यज्ञ मानला की त्यानंतर जगण्यातील प्रत्येक क्षण उत्सव होऊन जातो. आयुष्याचा असा वस्तू करत इतरांच्याही आयुष्यात उत्साह पेरणारा उत्साही आणि उत्साही माणूस म्हणून त्यांची विचारधारा आहे.
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.कृष्णकुमार गोयल यांनी प्रा. महादेव रोकडे यांची कला शाखा उपप्राचार्यपदी नियुक्ती केली. यावेळी सचिव आनंद छाजेड, सहसचिव तथा प्राचार्य डाॅ. संजय चाकणे, संचालक रमेश अवस्थे, संचालक शंकर यादव तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, डॉ. सुचेता दळवी, प्रा. राजेंद्र लेले, प्रा. नमिता कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक लक्ष्मण डामसे आदी यावेळी उपस्थित होते. जगणं सुंदर करणारा प्राध्यापक म्हणून प्रा. महादेव रोकडे यांची ओळख आहे. अशा या प्राध्यापकाला राज्यच नव्हे तर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे.