लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
जिल्ह्यातले पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध उपोषण करुन अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष अहमदनगरकडे वेधून घेण्याची किमया खासदार निलेश लंके यांनी काही महिन्यांपूर्वी करुन दाखवली होती. त्यांच्या या उपोषणाची चर्चा राज्यभर झाली होती. आता त्याच पद्धतीनं खासदार लंके यांनी नगर कॅन्टोन्मेंट बोर्डातल्या भ्रष्टाचाराचा भस्मासूर जमिनीत खोल गाडून टाकण्यासाठी हिंमत दाखवावी आणि अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करून दाखवावंचं, अशी अपेक्षा भिंगारचे लाखो मतदार खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांना आमचा जाहीर सवाल आहे, की खासदार निलेश लंके साहेब, नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बोगस बँक गॅरंटी प्रकरणात कधी लक्ष घालताय?
नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रवेश पथकर नाक्यामध्ये (एन्ट्री टोल टॅक्स) गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे टोलनाके चालविण्यासाठी संबंधितांनी तब्बल 4 कोटी 65 लाख रुपयांची बोगस बँक गॅरंटी दिल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेला आहे. खरं तर हा अतिशय गंभीर घोटाळा आहे. पण या प्रकरणी संबंधितांना कुठलंही शासन झालेलं नाही. त्यामुळे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांना या बातमीच्या माध्यमातून जाहीर आवाहन करावसं वाटतं, की नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 4 कोटी 65 लाखांच्या बोगस बँक गॅरंटीकडे जरा पहा. लोकसभा निवडणुकीत ज्या भिंगारकरांनी तुम्हाला प्रचंड मताधिक्य दिलंय, त्या भोळ्याभाबड्या भिंगारकरांवर माणुसकीच्या दृष्टिकोनातून जरा दया दाखवा.
वास्तविक पाहता ही बोगस बँक गॅरंटी तपासून पाहण्याची जबाबदारी खरं तर नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात रेव्हेन्यूचा (महसूल विभाग) टेबल सांभाळणाऱ्या बुटक्या आणि टकल्या अधिकाऱ्यासह अकाउंटंटपदाची जबाबदारी असलेल्या ‘मिंदे साहेब’ अशी ओळख असलेल्या अशा या दोघांचीच आहे. पण टकलावर नुकतेच नकली केस बसवून दाढीला मस्त असा कट मारुन ‘अभी तो हम जवान हैं’ अशा अविर्भावात फिरत असलेला बुटका आणि टकला अधिकारीच या प्रकरणात अप्रत्यक्षपणे भागीदार असल्यानं ही बँक गॅरंटी तपासण्याची गरज नसल्याचं त्यानं सांगितलंय.
अकाउंटंट असलेला ‘मिंदे साहेब’ हा तर नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातला मोठाच धाडसी अधिकारी. कारण प्रत्येक कामांच्या चेकवर एक टक्का कमिशन घेतल्याशिवाय तो सहीच करत नाही, हे जळजळीत वास्तव आहे. सीबीआयमार्फत या दोघांची चौकशी झाली तर सर्व काही सत्य उजेडात येऊ शकते.
नगर कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रवेश पथकर नाक्याचा ठेका चालविणाऱ्या ‘महाठकां’नी भिंगारच्याच एका बँकेबरोबर प्रचंड विश्वासघात केलाय. खऱ्या अर्थानं नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या दोन अधिकाऱ्यांनी संबंधित बँकेकडे खातरजमा करायला हवी होती. मात्र मोठा ‘मलिदा’ लाटण्याच्या नादात या दोघांनी खरं तर भिंगारकरांची विष्ठा खाण्याचंच दुष्कर्म केलंय. खासदार लंके यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घातल्यास मोठ्या आर्थिक घोटाळ्याची पाळंमुळं नक्कीच भिंगारच्या जनतेसमोर येतील, यात कुठलीही शंका नाही.
केंद्र सरकारचा ‘तो’ जीआर नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात आलाच नाही…!
केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाला तर साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या नगर शहराला अहिल्यानगर नाव मिळालं. या दोन्ही सरकारच्या आदेशामुळे नगरचं जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसमोर अहिल्यानगर असा बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भिंगारजवळच्या भुईकोट किल्ल्यात असलेल्या लष्करी विभागाच्या सप्लाय डेपोच्या कार्यालयासमोरदेखील अहिल्यानगर असा फलक लावलेला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर अजूनही अहिल्यानगर हे नाव लावण्यात आलेलं नाही. यासंदर्भात या कार्यालयातल्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता कार्यालयीन अधीक्षक असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने या संदर्भातला जीआर आमच्या कार्यालयात आलेला नाही, असं स्पष्ट सांगितलं. दरम्यान, या कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एक सदस्य समितीचे अध्यक्ष किंबहुना नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाची मुदतवाढ मिळालेले वसंत राठोड हे दोघे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतील का, हाच मोठा प्रश्न आहे.