लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली
राजधानी नवीदिल्लीत सुरु असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 हे प्रदर्शन इलेक्ट्रिक वाहनांमुळे लाखो नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलं आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच सौर उर्जेवर चार्ज होणारी कार या प्रदर्शनात अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या कारची किंमत फक्त 3 लाख 25 हजार रुपये आहेत.
तीन सीट असलेली ही कार कंपनीने सुरुवातीला तीन टप्प्यांमध्ये सादर केली आहे. दरम्यान, बंगळुरुच्या न्यूमेरोस या कंपनीने अवघ्या 1 लाख 9 आजारांमध्ये ई स्कूटर लॉन्च केली आहे. चीनच्या जेबीएम इलेक्ट्रिक कंपनीने लक्झरी कोच गॅलेक्सीसह चार नव्या इलेक्ट्रिक बसेस सादर केले आहेत. एक इंटरसिटी बस एक्सप्रेस, लो फ्लोर इलेक्ट्रिक मेडिकल मोबाईल युनिट ई मेडी लाईफ आणि स्काय मिड लाईफ या बसेस सादर केल्या आहेत.
या वाहन प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई या कंपनीने टीव्हीएस मोटर कंपनीसोबत भारतातल्या शेवटच्या टोकापर्यंत बसेस नेण्याचं स्वप्न पाहिलं आहे. व्हिएतनामच्या विन फास्ट या ऑटो कंपनीने चारचाकी वाहनांचे दोन आकर्षक मॉडेल 2025 च्या अखेरीस बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. एकंदरीतच, राजधानी नवीदिल्लीतलं हे वाहन प्रदर्शन वाहनप्रेमी नागरिकांसाठी मोठी पर्वणी ठरते आहे.