लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
नेवासे तालुक्यातल्या गळनिंब इथं दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी प्रवीण सुधाकर डहाळे यांच्या खूनप्रकरणातला आरोपी बंडू भिमराज साळवे (रा. बाबुर्डी बेंद ता. नगर) याने ॲडव्होकेट निखिल ढोले
यांच्यामार्फत जिल्हा आणि सत्र न्यायालयात ठेवलेला जामीन अर्ज अटी आणि शर्तीसह मंजूर करण्यात आला.
दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास शेखर अशोक उर्फ खंडू सतरकर, अशोक उर्फ खंडू किशोर सतरकर, दीपक सावंत, माऊली उर्फ अरुण दत्तात्रय गणगे, किशोर पटारे, जालिंदर बिरुटे आदींसह तीन इसमांनी प्रवीण डहाळे याच्यावर कोयते आणि तलवार अशा धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. इतर आरोपींनी लोखंडी रोड आणि दांड्याने मारहाण केली.
दरम्यान, या खून प्रकरणातल्या बंडू भीमराज साळवे याच्यावतीने जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीन अर्ज ठेवण्यात आला. सदरच्या अर्जावर वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून साळवे याचा जामीन अर्ज अटी आणि शर्तींसह मंजूर करण्यात आला. आरोपी साळवेच्यावतीने ॲडव्होकेट महेश तवले यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट निखिल ढोले यांनी काम पाहिलं.