लोकपत न्युज नेटवर्क / नेवासा / प्रतिनिधी
नेवासा फाटा इथल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात नेवासा भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठकीचं आज (१०) आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आपल्या महायुतीचा उमेदवार नेवासा तालुक्यामध्ये निवडून आणल्याबद्दल सर्वांचे प्रथमतः अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडणुकीदरम्यान केलेले कामाच्या व अडचणीचा व अनुभवाचा उल्लेख आपल्या मनोगत व्यक्त केलं.
याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बोलताना महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोर बाळासाहेब मुरकुटे यांच्या सोबत काम करणारे ज्या भाजप पदाधिकारी यांनी विरोधात काम केले, त्यांना बंडखोर मुरकुटेंप्रमाणेच त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी आणि पुन्हा त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आगामी काळातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष आणखी बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानालादेखील आजपासून प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीमध्ये पारित करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात येईल तसेच भविष्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले. याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा नेते ऋषिकेश शेटे, अशोक टेकणे, मनोज पारखे, ॲड. विश्वास काळे, डॉ. लक्ष्मण खंडाळे प्रताप चिंधे, सरपंच सतीश काळे, सरपंच पांडुरंग वाघ, सरपंच अंकुश धंधक, राजेद्र भाऊ दराडे, संभाजी लोंढे, अंकुश काळे, अमृता नळकांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस लक्ष्मण मोहिते, प्रमोद घावटे, निरंजन डहाळे, मनोज डहाळे, विलास बोरूडे, शिवाजी लष्करे, माऊली गंगावणे, नाना डौले , अब्दुल पठाण, आदिनाथ पटारे, आकाश कुसळकर, ऋषिकेश दारुंटे, पोपट शेकडे, निखिल जोशी, बाळासाहेब कोलते, सचिन देसरडा, राजेश कडू, दिनेश पिटेकर, संतोष कुटे यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.