Thursday, January 23, 2025

गृहमंत्रीपद कोणाकडे राहणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं…!

लोकपत न्युज नेटवर्क / मंत्रालय प्रतिनिधी / मुंबई

राज्याच्या मुख्यमंत्रीपदीचा पदभार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी परंपरेनुसार मंत्रालय वार्ताहर संघाच्या पत्रकारांशी संवाद साधला. संपूर्ण राज्याच्या नजरा लागलेल्या गृहमंत्री पदाविषयी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत बुद्धीचातुर्यानं उत्तर दिलं.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. ५) सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर शपथ घेतली. त्यानंतर परंपरेनुसार मुंबई वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची अंमलबजावणी, लाडकी बहीण योजना, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, राज्याचं गृहमंत्री पद या आणि अशा अनेक मुद्द्यांवर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगदी मनमोकळेपणानं दिली.

राज्याची प्रगती जास्तीत जास्त वेगाने आम्ही करणार आहोत. सामान्य माणसाला दिलासा मिळेल, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करु. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पाठीमागे आम्ही सकारात्मक धोरण अवलंबिलं होतं. यापुढेदेखील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आम्हीच योग्य तो निर्णय घेणार आहोत. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरच निर्देश दिले जातील, अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

राज्याचे गृहमंत्रीपद कोणत्या पक्षाकडे राहणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता या संदर्भातला निर्णय तिघे एकत्र बसून घेणार आम्ही घेणार आहोत. आम्ही तिघेही सरकार असून गृहमंत्रीपद हे सरकारकडेच राहणार, असं मिश्किल उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलं.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी