लोकपत न्यूज नेटवर्क / श्रीगोंदा
हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून दहशत निर्माण करण्यासाठी आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी येथे असलेले एका हॉटेलवर गोळीबार करण्यात आला. वैभव सुभाष चौधरी आणि साई संजय मदने (दोघे राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा) अशी गोळीबार करणाऱ्यांची नावं आहेत. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दोघा आरोपींविरोधात कोणाच्या काही तक्रारी असल्यास श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्या द्याव्यात, असं आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलं आहे.
शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी वैभव चौधरी, साई मदने आणि अनोळखी व्यक्ती काष्टी इथल्या एका हॉटेलमध्ये गेले. त्यांना जर आणखी चार अनोळखी तिथं आले. त्यातल्या तिघांनी दारुच्या बाटल्या फोडल्या. साई मदने याने हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमधून गावठी कट्टा आणला. तो गावठी कट्टा घेऊन वैभव चौधरी याने चार अनोळखी व्यक्तींच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने फायर केले.
या गोळीबारनंतर वैभव चौधरी जोरजोरात ओरडत म्हणाला, ‘मी काष्टीचा मोठा डॉन आहे. पोलीस माझ्या खिशात असून माझं कुणीच वाकडं करू शकत नाही. वैभव चौधरी आणि साई मदने यांच्याकडे गावठी कट्टे कुठून आले, या दोघांना कोणत्या राजकीय नेत्याचा आश्रय आहे, श्रीगोंदा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, वैभव चौधरी यानं गोळीबार कसा केला, याचा व्हिडिओ तुम्हीच पहा.